Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming शेतकरी मित्रांनो, सद्यःस्थितीत शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे अत्यंत फायदेशीर आहे. या लेखात मी आपल्यासाठी पर्यावरणाला पोषक आणि शेतीपूरक अशा व्यवसायाबद्दलची माहिती घेऊन आलो आहे. हा लेख आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना जरूर शेअर करावा.

Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming
Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming

शेतकरी मित्रांनो आपल्या भारतामध्ये मधमाश्यांच्या प्रामुख्याने चार प्रजाती आढळतात. 

त्यामध्ये दगडी माशी, अपीस, डोरसाटा या माश्या उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५० ते ८० किलो याप्रमाणे मिळत असते.

लहान माशी अपीस फ्लोरिआ या माश्या कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २०० ते ९०० ग्रॅम मध मिळत असते.

Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming

भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडिका या मधमाश्यांद्वारे होणारे मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६ ते ८ किलो असते. 

मधुमक्षिका पालनासाठी मधमाशी बरोबर पेटीची आवश्यकता असते. एका पेटीची किंमत ही सुमारे ३५०० रुपये असते. या पेटीत एकूण दहा फ्रेम असतात. तर एका फ्रेममध्ये २५० ते ३०० माश्या राहतात. 

माशीची निवड केल्यानंतर पेट्या योग्य ठिकाणी ठेवाव्यात, कालांतराने माश्या मधपेटीत मध साठवण्यास सुरुवात करतील. 'Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming'

मधाचे पोळे मधाने भरल्यानंतर ते योग्य पद्धतीने चाकूने कापून घ्यावे. त्यानंतर कापून घेतलेला भाग यंत्रात टाकावा, यंत्र सुरू झाल्यावर मध बाजूला होऊन नको असलेला भाग वेगळा होईल.

एका फ्रेममधून साधारण २०० ग्रॅम एवढा मध मिळते म्हणजे एका पेटीतून २ किलो मध आपल्याला प्राप्त होत असते. 

एका पेटीतून आपण महिन्याला ४ किलो मध काढू शकतो. हा मध आपणाला मेडिकल स्टोअर्स आणि किराणा स्टोअर्समध्ये विकता येतो.

तसेच मध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी संलग्न राहून आपण त्यांनाही मध विकू शकतो, याला सरासरी २०० रुपये किलो इतका भाव मिळतो. अशा प्रकारे साधारणतः आपण एका महिन्याला १०० पेट्यांमधून सरासरी ८०,००० रुपये किंमतीचे मध विकू शकतो.

मधमाशी पालनाचे फायदे:

  • फुलांचा रस/पराग यांचा सदुपयोग होतो, आर्थिक प्राप्ती मिळते व रोजगाराचा प्रश्न सुटतो.
  • शुद्ध मधाचे उत्पादन, मेणाचे उत्पादन व इतर आधारीत वस्तूंचे उत्पादन होते. 
  • कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर / शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो. शेतीतील भाजी, फुलांच्या उत्पादनात सव्वा ते दौड पटींनी वाढ होते. कारण मधमाश्या या परागीकरणाचे काम उत्तमरीत्या करतात. Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming
  • पर्यावरणावर मधमाशी पालनाचा सकारात्मक प्रभाव पडतो. परागीकरणासाठी मधमाश्या फारच महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे फळांचे उत्पादनही वाढते.

मधाचे आरोग्यदायी असणारे फायदे:

  • ऊर्जा देणारे एक उत्तम नैसर्गिक अन्नघटक
  • एक चांगले अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टीक
  • स्नायूंना बळकटी देणारे तसेच खोकला, कफ, दमा या विकारांवर रामबाण उपाय 
यासोबतच काही पिकांनाही मधमाश्यांचा फायदा होत असतो. यात कापूस, मोहरी, तीळ, कराळ, सूर्यफूल, वांगी, भेंडी, मिरची, काकडी, भोपळा, टोमॅटो, दुधी भोपळा, कारले, सफरचंद, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, लिची तूर, मूग, उडीद या पिकांना चांगला फायदा होत असतो.

मध शेती करताना घ्यावयाची काळजी:
  • मधमाशीपालन करताना पेट्या या खुल्या जागेत ठेवाव्यात. 
  • मधमाश्यांना त्रास दिल्यास त्या चावतात त्यामुळे त्यांनी चावा घेतल्यास योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
  • त्याचबरोबर मध काढताना किंवा मधमाशी पेटी हाताळताना विशिष्ट हेल्मेटचा वापर अवश्य करावा जेणेकरून मधमाश्यापांसून आपले संरक्षण होईल.
मधाची काढणी

  • पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे त्या भागातील मधमाश्यांना धुराने दूर करावे आणि पोळी काळजीपूर्वक कापून घ्यावीत. 
  • मधाची काढणी शक्यतो दोन मुख्य फुलोऱ्याच्या मोसमा दरम्यान आणि त्यांच्या लगेच नंतर, अनुक्रमे ऑक्टोबर/नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-जूनमध्ये काढणे शक्य होते. 
  • पिकलेले पोळे रंगाने हलके असते आणि मधाने भरलेले असते. दोन्ही बाजूंच्या निम्म्यापेक्षा अधिक मधाचे कप्पे मेणाने बंद केलेले असतात.

मधाच्या पोळ्याची स्थापना कुठे कराल?

  • पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मध उत्पादन केंद्र उभारावे. 
  • फळबागांच्या जवळ मकरंद, परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. 
  • पोळ्याचे तापमान आवश्यक तितके राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाश्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. 
  • मधमाश्या पेटीत ठेवताना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी अँटवेल्स ठेवावी, जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाहीत. 
  • वसाहतींना पाळीव जनावर, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते, इलेक्ट्रिक पोलपासून दूर ठेवावे.

दस्म्यान मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण घ्यायचे असल्यास  आपल्या जिल्ह्याच्या खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे किंवा भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे मिळू शकते. तसेच अधिकच्या  माहितीसाठी तुम्ही http://nbb.gov.in या संकेतस्थळावरील माहिती पाहू शकता.

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा "Ecofriendly Agricultural Supplement Business Bee Farming" हा लेख आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.