घरच्या घरी बोन्साय झाड कसे बनवायचे - How to make a Bonsai tree at home

How to make a Bonsai tree at home
How to make a Bonsai tree at home

How to make a Bonsai tree at home? प्रत्येकाला घराभोवती छोटीशी का असेना, बाग हवीशी वाटत असते. घराच्या आजूबाजूला हिरवाई असेल तर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. घरात मिनिएचर गार्डन बनवण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. त्याच दृष्टीने घरात बोन्साय सजवण्यास अनेकांची पसंती असते. विकत घेऊन जाता बोन्साय बरेच महाग मिळतात. अशावेळी घरीच ही जपानी कला शिकणं हा एक चांगला मार्ग ठरतो.

बोन्साय म्हणजे नक्की आहे तरी काय?

जपानी भाषेत बोन्साय याचा अर्थ बुटकी रोपं ! ही हजारो वर्षांपूर्वीची कला आहे. सजावटीबरोबरच मनोरंजनाच्या उद्देशानेही या कलेची जपणूक होत राहिलेली आहे. या पद्धतीने तयार केलेली रोपं अगदी १०० वर्षही जगू शकतात.  यासाठी दोन पद्धती अवलंबल्या जातात. एक म्हणजे एका छोट्या रोपापासून आणि दुसरी म्हणजे बीजापासून... मात्र बीजापासून बोन्साय तयार करण्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट आहे. म्हणूनच छोट्या रोपापासून बोन्साय तयार करणे अधिक सुकर ठरते. 'How to make a Bonsai tree at home'

बोन्सायला अनुवांशिकदृष्ट्या मातृ  झाडांची आवश्यकता नसते परंतु ते नियमित स्टॉक आणि बियाण्यापासून लहान झाडे वाढवण्यावर अवलंबून असते. बोन्साय रोपांची छाटणी, रूट कमी करणे, पॉटिंग, डीफोलिएशन आणि ग्राफ्टिंग यासारख्या लागवडीच्या तंत्रांचा वापर करून लहान झाडे तयार केल्या जातात.  जे हुबेहूब मोठ्या झाडांच्या आकार आणि शैलीची नक्कल करतात.

हे पण नक्की वाचा: पशुधनाची ओळख: गीर गाय

आज पाहूया बोन्साय करण्याची पद्धती...

बोन्साय अगदी आपण घरच्या घरी सुद्धा तयार करू शकतो. अत्यंत सोप्या पद्धतीने बोन्साय बनविण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करावा.

  • सर्वप्रथम योग्य आकाराची कुंडी निवडावी.
  • त्यानंतर एक रसरशीत आणि आरोग्यसंपन्न रोप निवडावे. आपल्याला ज्याचे बोन्साय करायचेय.
  •  साहजिकच त्या वृक्षाचं छोटसं रोप घ्यावे. 
  • हलक्या हाताने हे रोप उपटावे आणि मुळांना लागलेली माती स्वच्छ करून घ्यावी.
  • त्यानंतर मुळं आणि फांद्या छाटाव्या. कुंडीचा आकार लक्षात घेऊनच ही छाटणी व्हावी.
  • लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे कुंडीत रोप लावताना खालच्या दोन इंचाच्या मातीच्या थरापर्यंत मुळं असू नयेत. कुंडीत चांगल्या प्रतीची माती भरावी.
  • त्यानंतर मधोमध रोप लावावं आणि माती दाबून घ्यावी. कुंडीत माती भरण्याच्या आधी विटांचा भुगा टाकायला विसरू नये. How to make a Bonsai tree at home
  • काही दिवसानंतर रोप चांगलं लागल्यावर फांद्या कापाव्या आणि धातूच्या तारांनी बांधाव्या.
  • या वृक्षाची मूळ आकृती लक्षात घेऊन रोपाला योग्य तो आकार द्यावा.

घराच्या सजावटीसाठी बोन्साय

  • काही लोक फांद्या झुकवण्यासाठी वजन लावण्याचाही प्रयत्न करतात.
  • या रोपाची  जास्त काळजी घ्यावी लागते.
  • वृक्षाचा मूळ आकारासमोर ठेवत छाटणी करत राहिल्यास योग्य आकाराचं बोन्साय तयार होतं.
  • अर्थातच रोपाला योग्य त्या प्रमाणात पाणी आणि ऊनही मिळायला हवं.
  •  ठराविक काळानंतर मातीचा कस कमी होत असतो. हे लक्षात घेऊन योग्य वेळी कुंडीतली माती बदलणंही गरजेचं आहे.
  • काही कारणास्तव माती बदलणे शक्य नसल्यास त्यामध्ये उच्च प्रतीचे गांडूळ खत किंवा कुजलेल्या बायोगॅस स्लरी चा अवश्य वापर करावा.

"How to make a Bonsai tree at home" तर अशा पद्धतीने आपणसुद्धा घरच्या घरी हे जपानी कौशल्य आत्मसात करू शकतो.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना : Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
 Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी २७ हजार कोटी रुपयांची मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० टक्के तसेच अनुसूचित जाती - जमातींसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के रक्कम भरून सोलर पॅनेलसह पंप सेट देण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांयोजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना

    आपल्या राज्यातील शेतकरी बंधूंनी पूर्वापार आपल्या शेतीमधून जास्तीतजास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने सिंचनासाठी अगदी डिझेल पंपापासून ते वीजपंपापर्यंत अनेक प्रकारचे पंप अत्यंत कार्यक्षमरीत्या वापरले आहेत. त्यामुळे लवकरच शेतकरी बांधव हे तंत्रज्ञान आत्मसात करतील यात दुमत नाही.

    सौर पंप स्वस्त होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रोत्साहनपर योजना आणल्या असून देशातील व परदेशातील  क्षेत्रातील उत्पादक देखील हे तंत्र शेतकऱ्यांना कसे परवडेल या प्रयत्नात आहेत.

    मुंबई येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणच्या नोंदणी वेबपोर्टलचे उद्घाटन, पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले. महाराष्ट्रातील शेतक-यांना सिंचनासाठी १० लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाचे आहे. 'Magel Tyala Saur Krushi Pump Yojana'


योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय करण्यासाठी स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना फक्त १०% रक्कम भरून सौर पॅनेल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळेल.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५% आहे.
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदानित आहे
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पंप देण्याची योजनेमध्ये तरतूद
  • विम्यासह पाच वर्षांची दुरुस्ती हमी Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
  • वीज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध

लाभार्थी निवडीसाठीचे  निकष

  • २.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ३ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी क्षमतेचे आणि ५ एकरपेक्षा जास्त जमीन धारक शेतकऱ्यांना ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप देण्याची योजनेमध्ये तरतूद.
  • तसेच, शेतकऱ्यांनी पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपांची मागणी केल्यास ते अनुज्ञेय असेल.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेत तलाव, विहिरी, बोअरवेलचे मालक आणि बारमाही नद्या/नाल्यांच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहीर, नदी इ.मधील पाण्याचे स्त्रोत सुनिश्चित केले आहेत ते महावितरण खात्री करेल.
  • तथापि, जलसंधारणाच्या कामांच्या जलसाठ्यांमधून पाणी काढण्यासाठी या पंपांचा वापर करता येणार नाही.
  • ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही, ते देखील या अभियानांतर्गत लाभासाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही अशांना प्राधान्य
आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • ७/१२, ८ अ (सातबारा उताऱ्यावर विहीरीची नोंद आवश्यक)
"Magel Tyala Saur Krushi Pump Yojana" योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 👉येथे क्लिक करा.

पीएम सूर्यघर सोलर रुफटॉप योजना - Solar Rooftop Scheme

Solar Rooftop Scheme
Solar Rooftop Scheme

Solar Rooftop Scheme मित्रांनो, भारताचे पंतप्रधान, माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 30 जुलै 2022 रोजी रूफटॉप सोलरसाठी राष्ट्रीय पोर्टल तसेच पीएम सूर्यघर नावाची नवीन योजना लॉन्च केली आहे. घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याची रुफटॉप योजना ही महावितरणची एक महत्त्वाची योजना आहे. यामुळे विजेची बचत होऊन, पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे. चला तर मग या योजनेविषयी अधिक जाणून घेऊया.

कशी आहे पीएम सूर्यघर सोलर रुफटॉप योजना?

मित्रांनो पारंपरिक ऊर्जेचे स्रोत जसे की दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू हे आता मर्यादीत राहिलेले आहेत. त्यामुळेच इंधन दरवाढीचा प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत चाललेला आहे. यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करणे ही काळाची गरज आहे.

घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत सोलर पॅनल द्वारे वीजनिर्मिती करण्याच्या सिस्टिमला Solar Rooftop System असे म्हणतात.

अशी आहे कार्यप्रणाली
  • सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत वीजनिर्मिती करणे शक्य  आहे.
  • यामध्ये सोलर पॅनल हे सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे रूपांतर हे DC विद्युत ऊर्जेमध्ये करून देतात.
  • DC विद्युत ऊर्जेचे रुपांतर इन्व्हर्टर च्या मदतीने AC विद्युत ऊर्जेमध्ये केल्या जाते.
  • तयार होणाऱ्या AC विद्युत ऊर्जेचा वापर ग्राहक स्वतः करू शकतात. 'Solar Rooftop Scheme'
  • यामध्ये ग्राहकाचा फायदा असा आहे की स्वतः च्या घरावर केलीली वीजनिर्मिती ग्राहक स्वतः वापरू शकतो. उरलेली विद्युत ऊर्जा  Grid मध्ये पाठवून ठरलेल्या युनिट प्रमाणे महावितरण विकत घेते.
  • ग्राहकाने किती वीज वापरली? आणि ग्राहकाने महावितरणला किती वीज पाठवली? या सर्व नोंदी नेट मीटर(Bi-Directional Meter/Net Meter) यामध्ये केल्या जातात.
  • तर जनरेशन मीटर (Generation Meter) मध्ये ग्राहकाद्वारे केलेल्या वीजनिर्मितीचे रेकॉर्ड राहते.



अनुदान किती मिळणार?

वीज ग्राहकांना त्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे अनुदान वितरित केल्या जाते.
  • १ किलोवॅट पर्यंत ३०००० रुपये अनुदान
  • २ किलोवॅट पर्यंत ६०००० रुपये अनुदान
  • ३ किलोवॅट व त्यापेक्षा अधिक ७८००० रुपये अनुदान Solar Rooftop Scheme
  • निवासी गृहनिर्माण संस्था, घर संकुलासाठी ९० लक्ष रुपये (कमाल) अनुदान 

Solar-Rooftop-Scheme
Solar Rooftop Scheme

योजनेची वैशिष्ट्ये 

  • घरगुती बिलात मोठी बचत 
  • योजना महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी लागू
  • घरगुती वापरा एवढी किंवा त्यापेक्षा जास्त वीजनिर्मिती ही छतावरील सौरपॅनेल द्वारे झाल्यास शून्य वीजबील येणार
  • घरगुती ग्राहक, गृहनिर्माण संस्था, निवासी कल्याणकारी संघटनांना योजना राबविता येणार
  • अतिरिक्त निर्मित वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार
  • यापासून २५ वर्षांपेक्षा जास्त वीजनिर्मिती करणे शक्य
कुठे संपर्क साधाल?

"Solar Rooftop Scheme" या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा किंवा पीएम सूर्यघर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

Pradhanmantri Krushi Sinchan Yojana मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सूक्ष्म सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवली जाते. योजने अंतर्गत मिळणारे अनुदान, पात्रता याविषयी अधिक जाणून घेऊया.

Pradhanmantri Krushi Sinchan Yojana
Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

  • पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.
  • तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते.
  • तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह, पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

अनुदान

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेलः 'Pradhanmantri Krushi Sinchan Yojana'

  • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी - ५५ %
  • इतर शेतकरी - ४५%

हे पण नक्की वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी लागणारी पात्रता

  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  • शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही. 
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  • शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
  • शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात. Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ प्रमाणपत्र
  • ८-ए प्रमाणपत्र
  • वीज बिल
  • खरेदी केलेल्या संचाचे बिल
  • पूर्वसंमती पत्र

पात्र लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या अटी

खालील अटींची पूर्तता करणारे शेतकरीच सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील:
  • शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काचा ७/१२ व ८-अ उतारा असावा.
  • सूक्ष्म सिंचन उपघटकाचा तसेच पाणी व्यवस्थापण पुरक बाबी उप घटकांतर्गत पंपसंच, डिझेल इंजिन, सोलार इंजिन इ. बाबीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी व त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी. ७/१२ उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत शेतकऱ्याकडून स्वयं घोषणापत्र घेण्यात यावे. इतर साधनाव्दारे (बंधारे/कॅनॉल) सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधित (जलसंधारण/जलसंपदा) विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्याकडून घेण्यात यावे.
  • सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबधितांचे करारपत्र असावे.
  • विद्युत पंपाकरिता कायमस्वरुपी विद्युत जोडणी असावी. त्या पृष्ठवर्थ शेतकऱ्यांकडून मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत प्रस्तावासोबत घेण्यात यावी. सोलर पंपाची व्यवस्था असल्यास सोलर पंप बसवून घेतल्याबाबतचे पत्र व सोलर पंपाबाबतची कागदपत्रे प्रस्तावा सोबत घेण्यात यावीत.
  • शेतकऱ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
  • एखादा लाभधारक योजनेत सहभागी होण्यास पात्र आहे, मात्र त्याच्याकडे आधार क्रमांक नाही, अशा लाभधारकांना आधार क्रमांक प्राप्त होईपर्यंत, आधार नोंदणी पावती/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/ पासपोर्ट/ रेशनकार्ड/शासकीय कर्मचारी असल्यास ओळखपत्र/बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबूक/मनरेगा कार्ड/किसान फोटो यापैकी पुरावा सादर केल्यास योजनेचा लाभ देण्यात यावा.
  • अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात PFMS प्रणालीद्वारे जमा करण्यता यावी.
  • पात्र शेतकऱ्यास ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात यावा. मात्र सन २०१७-१८ पूर्वी ज्या क्षेत्रावर मागील १० वर्षाच्या कालावधीत सुक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला असेल अशा क्षेत्रावर लाभ अनुज्ञेय असणार नाही. तशाप्रकारचे "लेखी निवेदन" शेतकऱ्याकडून घेण्यात यावे. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील नोंदीवरुन त्याची प्रत्यक्षात खात्री करुन घेण्यात यावी. याबाबतची खातरजमा करण्याची संपूर्ण जबाबदारी कृषी सहायक / कृषी पर्यवेक्षक/ तालुका कृषी अधिकारी यांची राहील.
शेतकरी मित्रांनो आपण "Pradhanmantri Krushi Sinchan Yojana" या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.

येथे क्लिक करा: महाDBT Farmer

पशुधनाची ओळख : माडग्याळ मेंढी - Madgyal Sheep Breed in Marathi

Madgyal Sheep Breed in Marathi महाराष्ट्रातील मेंढीपालन व्यवसायाचा विचार केला तर प्रामुख्याने हा व्यवसाय मांस उत्पादनासाठीच केला जातो. सध्या ज्या मेंढ्यांचा सांभाळ मेंढपाळ करत आहेत, त्या मेंढ्यांची उत्पादनक्षमता नगण्य आहे. शिवाय उत्पादनही कमी प्रतीचे आहे. त्यावर पर्याय म्हणून जलद वजनवाढ असलेल्या माडग्याळ मेंढीच्या जातीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Madgyal Sheep Breed in Marathi
Madgyal Sheep Breed in Marathi

पशुधनाची ओळख : माडग्याळ मेंढी

  • महाराष्ट्रात सध्या एक लाखाच्या आसपास कुटुंबांचा मेंढीपालनाचा व्यवसाय प्रामुख्याने पश्चिम व मध्य महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात केला जातो. त्यामुळे वर्षातील जवळजवळ सहा महिने चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळ व्यावसायिकांना भटकंती करावी लागते. राज्यात प्रामुख्याने कोल्हापुरी, लोणंद, माडग्याळ, सोलापुरी आणि संगमनेरी अशा उपजातींचा मेंढीपालनात समावेश होतो.
  • सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावचे सभोवताली सिद्धनाथ, कवठेमहंकाळ, रांजणी या भागात माडग्याळ मेंढ्या आढळून येतात. माडग्याळ या गावावरूनच या मेंढ्याना हे नाव प्राप्त झाले आहे. 
  • माडग्याळ हे जत तालुक्यातील गाव. या गावातील मेंढ्या अत्यंत हुशारीने फार पूर्वीपासून निवड पद्धतीने मांस उत्पादनासाठी विकसित करण्यात आल्या आहेत. आजही आप्पाची वाडी, घोलेश्वर, कोणीकोनूर, माडग्याळ, पंडोझरी, सनमडी, सोन्याळ या भागात शुद्ध जातीच्या माडग्याळ मेंढ्यांचे संगोपन केले जाते व मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जाते. 'Madgyal Sheep Breed in Marathi'
  • सन २०१२ च्या पशुगणनेनुसार सांगली जिल्ह्यातील एकूण माडग्याळ मेंढ्यांची संख्या १,५७,३९० आहे. 
  • माडग्याळ परिसरातील मुख्यत्वे धनगर आणि रामोशी समाज यांच्याकडे या मेंढ्या मोठ्या प्रमाणात आहेत.
  • अत्यंत छोटा कळप साधारणतः ३० ते ३५ मेंढ्याचा असतो, या मेंढ्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेता संबंधित मेंढपाळ या जातीचे संवर्धन अत्यंत काटेकोरपणे करीत आहेत. 
  • साधारणत ६ ते ९ महिन्याची कोकरे विक्रीसाठी तयार असतात. आटपाडी, माडग्याळ, जत, अशा नजीकच्या बाजारातून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. कर्नाटक, आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात पशुपालक या ठिकाणी खरेदीसाठी येतात.

माडग्याळ मेंढ्यांचे शारीरिक गुणधर्म

  • मेंढ्यांच्या शारीरिक गुणधर्माचा विचार केला तर त्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. 
  • नाक मात्र फुगीर असते. या नाकाला रोमन पद्धतीचा विशिष्ट बाक असतो. 
  • पाय लांब असतात. त्यामुळे काटकपणा दिसून येतो. 
  • डोके, चेहरा, पोट व पाय या भागावर लोकर आढळत नाही. 
  • तपकिरी रंगाचे शेपूट लहान, आखूड व पातळ असते. 
  • कान लांब, पानासारखे लोंबकळणारे असतात. 
  • खुरांचा रंगदेखील तपकिरी असतो. Madgyal Sheep Breed in Marathi
  • मेंढीमध्ये गोल कास व सड टोकदार असतात. 
  • ही जात अत्यंत काटक व अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरून राहणारी आहे. 
  • जलद वाढीबरोबरच वर्षातून एक वेत नियमित मिळते. 
  • जुळी कोकरे देण्याचे प्रमाण या जातीत जास्त आहे. 
  • १८ ते २४ महिन्यात कोकरू पहिल्यांदा विते.

माडग्याळ जातीची वैशिष्ट्ये

  • दख्खनी मेंढ्यापेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान, रंगाने पांढऱ्या व अंगावर तपकिरी चट्टे असणाऱ्या या मेंढ्याची शरीरवाढ चांगली असून बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करत आहेत. 
  • या मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन ३ ते ३.५ किलो असून तीन महिने वयाचे वेळचे वजन १८ ते २२ किलो व सहा महिने वयाचे वेळचे वजन २५ ते ३० किलो आहे. 
  • पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो एवढे आहे. तीन महिने वयापर्यंत या मेंढीचे वजन वाढीचा दर १७५ ते २४० ग्रॅम प्रति दिन एवढा आहे. या मेंढ्यांच्या अंगावर लोकर अत्यंत कमी असून त्यांची लोकर कातरणी फक्त एकदाच करतात.
  • जलदगतीने होणारी मेंढ्यांची वजनवाढ, त्यामुळेच या मेंढ्यांची आज बाजारात चढ्या दराने विक्री होते.

शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे या संस्थेमार्फत मेंढी विकासाबाबत विविध स्तरावर संशोधन करण्यात येत आहेत. 

माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाच्या प्रक्षेत्रावर केंद्र शासनाच्या मदतीने नामशेषप्रवण प्रजातीचे संवर्धन व विकास या कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून घेऊन रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली येथे हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याद्वारे निवडक सुधारीत मेंढे नर हे पशुपालकांना रास्तभावाने पुरविण्यात येणार आहेत. 

तर अशा या "Madgyal Sheep Breed in Marathi" माडग्याळ प्रजातीचे संवर्धन केल्यास महाराष्ट्राच्या मांस उत्पादनात निश्चितपणे वाढ होऊन ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना - Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच अनुसूचित जाती मध्ये येत असलेल्या नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. चला तर मग या योजनेविषयी जाणून घेऊया.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

अनुदान: 

या योजनेंतर्गत 
  • नवीन विहीर (रु.२.५० लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.५० हजार), 
  • इनवेल बोअरींग (रु.२० हजार), 'Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana'
  • पंप संच (रु.२० हजार), 
  • वीज जोडणी आकार (रु.१० हजार), 
  • शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.१ लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच- रु.५० हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.२५ हजार), 
  • पीव्हीसी पाईप (रु.३० हजार) परसबाग (रु.५००/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. 

सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

पात्रता: 
  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • जमिनीच्या ७/१२ व ८-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची जमिनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर याबाबीकरीताः
  • १) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • २) ७/१२ व ८-अ चा उतारा
  • ३) तहसीलवार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. १,५०,०००/- पर्यंत
  • ४) लाभार्थीच प्रतिज्ञापत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर
  • ५) अपंग असल्यास प्रमाणपत्र 
  • ६) तलाठी यांचेकडील दाखला सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • ७) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • ८) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • ९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • १०) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थीसह).
  • ११) ग्रामसभेचा ठराव. Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीताः
  • १) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • २) तहसीलदार याचेकडील मागील वर्षीचे बार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. १,५०,०००/- पर्यंत).
  • ३) जमीन धारणेचा अद्यावत ७/१२ दाखला व ८अ उतारा. ४) ग्रामसभेचा ठराव
  • ५) तलाठी यांचेकडील दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.२० ते ६ हेक्टर
  • मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतुःसीमा.
  • ६) लाभार्थीचे बंधपन्न (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर),
  • ७) कृषि अधिकारी (विघयो) याच क्षेत्रीय पहणी व शिफारसपत्र
  • ८) गट विकास अधिकारी याच शिफारसपत्र 
  • ९) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती / इनवेल बोअरींगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा काम सुरु होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
  • १०) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report
  • ११) अपंग असल्यास प्रमाणपत्र 

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीताः

  • १) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • २) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. १,५०,०००/- पर्यंत).
  • ३) जमीन धारणेचा अद्यावत ७/१२ दाखला व ८अ उतारा.
  • ४) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत)
  • ५) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
  • ६) शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमीपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • ७) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
  • ८) विद्युत कनेक्शन व विद्युत पपसंच नसलेबाबत हमीपत्र
  • ९) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
शेतकरी मित्रांनो आपण "Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana" या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.

येथे क्लिक करा: महाDBT Farmer

पशुधनाची ओळख: पंढरपुरी म्हैस - Pandharpuri Buffalo Information in Marathi

Pandharpuri Buffalo Information in Marathi मित्रांनो, जगातील एकूण म्हशीच्या ५२ टक्के म्हशी भारतात आढळतात. भारतात म्हशीच्या एकूण १७ जाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील पंढरपुरी ही एक जातिवंत म्हैस म्हणून ओळखली जाते. सर्वाधिक दूध देणारया म्हशीही भारतातच आहेत, हे विशेष.

Pandharpuri Buffalo Information in Marathi
Pandharpuri Buffalo Information in Marathi

पशुधनाची ओळख: पंढरपुरी म्हैस

  • महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर, बेळगाव व निपाणी या परिसरात पंढरपुरी म्हशी आढळून येतात.
  • फार पूर्वीपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि परिसरात संगोपन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या म्हशीस पंढरपुरी म्हैस म्हणून ओळखतात.
  • या म्हशीला कर्नाटक मध्ये धारवाडी या नावाने ओळखतात. हिलाच विदर्भ मराठवाड्यात वऱ्हाडी, गावरानी म्हणतात.

    • पंढरपुरी म्हैस आकाराने मध्यम व स्वभावाने शांत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध उत्पादन टिकवून ठेवण्याची क्षमता बाळगणारी ही जात आहे. पंढरपुरी म्हशी या काळ्या रंगाच्या तर, काही वेळा भुरकट रंगाच्याही आढळून येतात. शेपटीचा गोंडा मात्र पांढरा असतो. काही वेळा काळा पांढरा गोंडाही आढळून येतो. 'Pandharpuri Buffalo Information in Marathi'
    • साधारणपणे पंढरपुरी म्हशींमध्ये वेतातील नियमितता हा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा व चांगला आढळून आला आहे. व्यायल्यानंतर अडीच ते तीन महिन्यात पुन्हा गाभण राहण्याचे प्रमाण या म्हशींमध्ये मोठे आहे.
    • ३ ते ४ महिन्यांचा भाकड काळ, वेतातील नियमितता व दोन वेतातील कमी अंतर यामुळे पंढरपुरी म्हैस आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरते. पारड्यादेखील लवकर वयात येऊन गाभण राहतात व कमी वयात वेत होते. त्यामुळे संगोपन काळातील त्यांच्यावरील खर्च देखील कमी होतो.
    • इतर जातीपेक्षा दुग्धोत्पादन कमी असले तरी गरीब शेतकऱ्यांना परवडणारी जात आहे. तसेच हवे तेव्हा पान्हा येत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये गवळी लोक रस्त्यावर पाहिजे तेव्हा ताजे दूध काढून देतात.

    पंढरपुरी म्हशींची वैशिष्ट्ये

    • आकाराने मध्यम पण अतिशय काटक जात.
    • लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोहचणारी लांब व पिळवटलेली तलवारीसारखी शिंगे.
    • म्हशीचे वजन साधारण ४०० किलो व रेड्याचे वजन ५०० किलो असते.
    • पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यात गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यात पहिल्यांदा वितात.
    • मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ.
    • पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य.
    • एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध उत्पादन क्षमता.
    • हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत.

    पंढरपुरी म्हशींचे गुणधर्म

    • पंढरपुरी म्हशीची शिंगे तलवारीच्या आकाराची बाक असलेली आणि खांद्यापर्यंत लांबसडक वाढलेली असतात. Pandharpuri Buffalo Information in Marathi
    • जादा दूध देणाऱ्या म्हशीमध्ये छातीचा घेर हा कमरेच्या घेरापेक्षा कमी असतो.
    • पाठीमागील चौकावरील हाडामध्ये साधारण २ ते २.५ फूट अंतर असेल तर ती म्हैस जास्त दूध देणारी असते. पंढरपुरी म्हशीचे डोके लांबोळे व निमुळते असून, नाकपुड्या मात्र उठावदार असतात.
    • कास घोटीव असून, मांड्यांच्या आडाला लपलेली असते व पुढील भाग बेंबीच्या बाजूस लांबपर्यंत पसरलेला असतो. कासेचा आकार साधारणत उथळ घमेल्यासारखा आकार असतो. सड गोलाकार मुल्य असतात.
    • दूध उत्पादन साधारण ६ ते ९ लिटर प्रतिदिन असते. एका वेताला सरासरी १५०२ लिटर दूध उत्पादन मिळते व त्यातील स्निग्धांश सरासरी ७ टक्के आढळून येतो. दूध उत्पादनातील सातत्य हा एक महत्त्वाचा गुणधर्म या जातीत आढळून येतो.

    पंढरपुरी म्हशींची आढळ

    • जातिवंत पंढरपुरी म्हशी या पंढरपूर व सोलापूर भागातील कार्तिकी वारीच्या बाजारात व मकर संक्रांतीला भरणारी श्री सिद्धेश्वर यात्रा, आठवडे बाजारात विकत मिळतात. तसेच सांगोला, कोल्हापूर व मिरज येथील बाजारातही या म्हशींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. तथापि, मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने या म्हशींच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
    • पंढरपुरी म्हशीच्या पैदाशीसाठी गोठीत विर्याच्या मात्रा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर (०२३१-२६९३७१७) यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
    • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहमदनगर) अंतर्गत विभागीय कृषी संगोपन केंद्र व शेडा पार्क, कोल्हापूर येथे पंढरपुरी म्हशींवर संशोधन करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
    • तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पशुधनविकास मंडळ, अकोला यांच्याद्वारे पंढरपूर, माढा, सांगोला व मंगळवेढा या ठिकाणच्या पंढरपुरी म्हैस संगोपन करणाऱ्या पशुपालकांसाठी वंशावळ निवडीतून उच्च आनुवांशिकतेच्या पंढरपुरी रेडे उत्पादन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
    • या योजनेअंतर्गत घरपोच कृत्रिम रेतन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी उच्च प्रतीच्या वीर्यमात्रांचा वापर केला जातो, जेणेकरून जादा दूध उत्पादन देणाऱ्या पंढरपुरी म्हशींची पैदास होईल.
    • पशुपालकांकडे असणाऱ्या जादा दूध देणाऱ्या पंढरपुरी म्हशींना बिल्ला मारून त्यांचे दूध उत्पादन नोंदी ठेवणाऱ्या पशुपालकांना रु. १०००/- प्रोत्साहनपर बक्षीसदेखील या योजनेअंतर्गत देण्यात येते.
    • वंध्यत्व निवारण शिबिर, लसीकरण, गर्भतपासणी तसेच तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी व त्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. वेळोवेळी नर-मादी वासरांचे मेळावेदेखील आयोजित करून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यात येते.

    शेतकरी मित्रांनो, "Pandharpuri Buffalo Information in Marathi" पंढरपुरी म्हशीसारख्या बहुगुणी म्हशींची जोपासना व संवर्धन ही काळाची गरज आहे.

    कृषि प्रक्रिया उद्योग : आर्थिक उन्नतीचा मार्ग - Agricultural and Food Processing Business

    Agricultural and Food Processing Business मित्रांनो, व्यवसाय नेमका कोणता करावा हा अत्यंत बिकट प्रश्न सध्या नवउद्योजकांना पडत आहे. या लेखात मी अशाच एका व्यवसायाबद्दल बोलणार आहेचला तर मग याविषयी अधिक जाणून घेऊया.

    Agricultural and Food Processing Business
    Agricultural and Food Processing Business

    सद्यःस्थितीत ग्रामीण भागात शेतातून पिकलेला कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध असून मजुरही बऱ्याच प्रमाणात मिळू शकतात. त्याच कृषी मालावर प्रक्रिया करून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारता येतो. 

    कृषि प्रक्रिया उद्योग स्वयंरोजगारातूनही उभारता येतात. कारण शेतीची कामे वर्षभर नसतात. भूमिहीन आणि अल्पभूधारकही यात सामील होऊ शकतात. 

    यामध्ये शेतकरी गटांना किंवा महिला बचत गटांना खूप चांगली संधी आहे. गरज आहे फक्त सुयोग्य तंत्रज्ञानाची, प्रशिक्षणाची आणि यंत्राची. ते सुद्धा अलिकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत, अशा उद्योगाचे व्यवस्थापनही सोपे असते आणि भांडवलही फार कमी प्रमाणात लागते. 

    सध्या बऱ्याच राष्ट्रीय आणि शासकीय बँका उद्योगासाठी कर्जाऊ भांडवल पुरवितात, तसेच बन्याच शासकीय योजनांतून अनुदान प्राप्त होऊ शकते.

    कृषि प्रक्रिया उद्योगाचे फायदे:

    • कच्च्या शेतमालास भरपूर मागणी वाढून उत्पादन वाढविण्याकडे कल जातो.
    • पिकाचा सर्व भाग तेथेच उपलब्य असल्याने उपयोगात येतो. 'Agricultural and Food Processing Business'
    • कच्चा आणि पक्का माल यांचे वाहतुकीचा खर्च उपभोक्त्याला भोगावा लागत नाही.
    • शेतमालास चांगली किंमत मिळू शकते, तसेच पक्का माल किफायतशीर दरात उपलब्ध होतो.
    • कृषि प्रक्रियेचा पक्का माल प्रक्रियेतून निघण्यास कमी वेळ लागतो.
    • अशा उद्योगामुळे भरपूर फायदा मिळून शेतकऱ्याचे राहणीमान उंचावण्यास मदत होते.

    व्यावसायिक मर्यादा:

    • शेतमाल विशिष्ट वेळेसच मिळतो. इतर वेळेस प्रक्रिया करण्यासाठी साठा करावा लागतो.
    • पिकात बदल झाल्यास उद्योग निकामी होण्याची जोखीम असते.
    • आधुनिक आणि सुयोग्य तंत्रज्ञान याबाबत तांत्रिक प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.
    • बाजारात आवश्यक असणाऱ्या मालाची प्रत आणि संख्या याबाबत फारशी माहिती उपलब्ध नसते.
    • शेतमालाचे एकच वाण किंवा प्रत मिळत नसल्याने प्रक्रियेत वस्तुंची प्रत कायम राखणे कठीण जाते.

    यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक बाबी:

    • स्वत:वरील विश्वास कधीही ढळू देऊ नका. 
    • ध्येय आणि नियोजन पक्के करून त्याप्रमाणे कामास लागा. 
    • आपल्या मित्र परिवारात बदल करून जास्तीत जास्त उद्योजक मित्रांसोबत रहा. 
    • जास्तीत जास्त मित्र परिवार ठेवा. 
    • वेळेचे नियोजन करा. Agricultural and Food Processing Business
    • आपल्या वाचनात उद्योजकांच्या मुलाखती, आत्मकथा, उत्पादनांची माहिती, बँकांची माहिती इ. संदर्भातील पुस्तके ठेवा. 
    • घरातील व्यक्तींना आपल्या स्वप्नात सामील करून घ्या. त्यांचे सहकार्य व प्रेरणा मिळवा. 
    • काही वेळेस चाकोरीबाहेर विचार करून कल्पकतेने प्रश्न सोडवा. 
    • लोकांना मनापासून योग्य मोबदला घेऊन सेवा/मदत द्या. 
    • लोकांची सेवा/मदत घेतांना योग्य मोबदला द्या. 
    • नेहमी सकारात्मक भूमिका ठेवा. 
    • चुका झाल्यास हरकत नाही, पण झालेली चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्या. 
    • जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा. कारण शेतीच्या उत्पादनात वाढ झाल्याने कच्चा माल माफक दरात मिळू शकेल. 
    • सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण जरूर घ्या, 
    • कच्च्या मालाची उपलब्धता, यंत्राची उत्पादन क्षमता आणि प्रक्रिया केलेल्या वस्तुची मागणी यांचा योग्य समन्वय साधा. 
    • उपभोक्त्याची आवड, निवड, चव, रंग, आकर्षकता आणि मागणी या सर्व बाबीबद्दल व्यापारी आणि उद्योजकांमध्ये विचार विनिमय करा. 
    • उत्पादित वस्तुची बाजारी किंमत कमीत कमी राहील याकडे लक्ष द्या. 

    कृषि प्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यासाठी सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक बाबी

    • कृषि प्रक्रिया का करावी? 

    अ) कृषि प्रक्रिया केल्याने कच्च्या मालापेक्षा प्रक्रियीत मालास जास्त भाव मिळतो. त्यामुळे उत्पन्न वाढते. राहणीमानही उंचावते. 

    ब) ग्रामीण उद्योजकता आणि रोजगार यासाठी विविध सरकारी योजना आहेत. त्यामधून भांडवल, कर्ज, कच्चा माल आणि पक्क्या मालास बाजारपेठ अशा प्रकारचे फायदे मिळू शकतात. ग्रामीण भागात प्रक्रिया केल्याने कमी भावात प्रक्रियीत पक्का माल उपलब्य होऊ शकतो.

    • प्रक्रिया कशावर करावी? 

    आपण ज्यावर प्रक्रिया करणार आहोत त्या प्रक्रियीत मालास मागणी मिळणे आवश्यक आहे. कारण अलिकडे बाजारपेठेत बऱ्याच प्रमाणात चढाओढ आढळते. एका बाजूला महागाई आणि दुसऱ्या बाजूला चढाओढ यामध्ये उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत या दोन्ही गोष्टोची सांगड घालणे कठीण जाते, म्हणून बाजारात मागणी असणाऱ्या पदार्थाचेच उत्पादन करणे हिताचे ठरते. 

    • प्रक्रिया किती प्रमाणात करावी? 

    जास्तीत जास्त मालावर प्रक्रिया म्हणजे भरपूर फायदा असा आपण अंदाज बांधतो. परंतु प्रक्रियोत पदार्थासाठी असणारी मागणी ठराविक असल्याने किती मालावर प्रक्रिया करावी हे आधी ठरवावे लागेल.

    • प्रक्रिया कशी करावी? 

    विविध क्षेत्रात भरपूर प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. काही कमी किंमतीबी सुद्धा तंत्रे आहेत, जे ग्रामीण स्तरावर कमी भांडवलात प्रक्रिया करण्यासाठी वापरता येतात, उदा, कडधान्यापासून डाळी तयार करण्याचे तंत्र. प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रे वापरल्यास भांडवल जास्त लागते. तसेच स्वयंचलित नसल्यास मंजुरी जास्त लागते. परंतु स्वयंचलित यंत्रास प्रथम एकदाच भांडवल लागते, मात्र मजुरी सतत लागत नाही. म्हणून आपण ठरविलेले तंत्रज्ञान या दृष्टिने योग्य आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

    • प्रक्रिया कोणी करावी? 

    प्रक्रिया कोणीही करू शकतो. बहुतेक क्षेत्रात चढाओढ असल्याने अलिकडे प्रशिक्षण घेणे आवश्यक झाले आहे, खरे तर कुठलाही व्यवसाय करावयाचा असल्यास प्रबळ इच्छाशक्ती हे महत्त्वाचे भांडवल आहे. ते ज्यांच्याकडे उपलब्ध असेल त्याने प्रक्रियेचा व्यवसाय जरूर करावा. असे हे भांडवल प्रशिक्षणामधूनही मिळविता येते. यामध्ये उत्पादकाने (शेतकरी) प्रक्रियक होणे आवश्यक आहे. तसेच विविध प्रकारे व्यवसाय करता येतो, उदा. स्वतः प्रक्रियक होणे, सहकारी तत्त्वावर व्यवसाय करणे इ.

    • प्रक्रियेची स्थापना कोठे करावी?

    सहसा ज्या भागात कच्चा माल तयार किंवा उपलब्ध होतो, अशा ठिकाणी प्रक्रिया व्यवसायाची स्थापना करता येईल, तसेच तयार प्रक्रियीत मालासाठी मागणीही (बाजारपेठ) असावी, अन्यथा मालाच्या वाहतुकीसाठो भरपूर खर्च होईल, शिवाय ज्या जागेवर उद्योग उभारावयाचा तिचीही व्यवस्थीत पाहणी करावी लागेल, उदा. विद्युत प्रवाह, पाणी, मजूर आणि जवळपास कच्चा माल याची उपलब्धता, पुरेशी जागा, विक्स घ्यावयाची असल्यास जागेची किंमत इ. 

    • आर्थिक बाब आणि बाजारपेठ कशा सांभाळाव्यात? 

    उद्योगासाठी वेगवेगळ्या संस्था किंवा बँकाकडून भांडवल उभारणी करणे, व्यवसायाचा हिशेब आणि नफातोटा याबाबत ज्ञान असणे, बाजारपेठेबाबतची सावधानता, प्रक्रियित मालाबाबत खात्रीची माहितो मिळविणे आणि त्यानुसार सावधानतेने निर्णय घेणे या गोष्टीची जाण आणि भान ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

    संदर्भ: डॉ. पं. दे. कृ. वि. कृषि मार्गदर्शिका

    तर मित्रांनो तुम्हाला माझा "Agricultural and Food Processing Business" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर इतरांना  शेअर करायला विसरू नका धन्यवाद!