पशुधनाची ओळख: गीर गाय - Gir cow information in Marathi

Gir cow information in Marathi मित्रांनो कर्नाल (हरियाणा) राष्ट्रीय पशू आनुवांशिक संशोधन संस्थेमध्ये देशातील ५० देशी गोवंशांची अधिकृत नोंद झाली आहे. त्यालाच आपण देशी गोवंश असे संबोधतो. त्यामधीलच गीर या प्रसिद्ध गोवंशाबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Gir cow information in Marathi
Gir cow information in Marathi

पशुधनाची ओळख: गीर गाय

  • गुजरात राज्यातील गीर जंगलाच्या नावावरून या गायीला गीर म्हणून ओळखले जाते. तथापि, गुजरातच्या वेगवेगळ्या भागात देसन, गुजराती, भोदाली, काठियावाडी, सोरठी व सुरती या नावानेदेखील गीर गाय ओळखली जाते.
  • सौराष्ट्र भागातील राजकोट, जुनागड, गीरसोमनाथ, भावनगर व अमरेली जिल्ह्यातही गीर गाय आढळून येते. देशी गायीच्या यादीतील जादा दूध देणारी जात म्हणून गीर गायीचा उल्लेख आर्वजून केला जातो.
  • कसदार आणि पौष्टिक दूध यामुळे गीर गार्थीच्या संगोपनाला पशुपालक तसेच शेतकरी बांधवांनी आला प्राधान्य दिले आहे. बाजारात गीर गायीच्या दुधाला इतर गायींच्या दुधापेक्षा जादा दर मिळत असल्याने गीर गाय संगोपनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
  • मजबूत बांधा आणि उंचपुऱ्या गीर गायी इतर गायींपेक्षा अधिक रुबाबदार दिसून येतात. या गायींच्या रंगात विविधता आढळून येते. लालतांबूस रंग जवळपास ६० टक्के जनावरांमध्ये आढळतो.
  • भावनगर व सुरेंद्रनगर भागात काही ठिकाणी राजकोट जिल्ह्यात लालतांबूस रंगासह पांढरे ठिपके असलेल्या गीर गायी आढळतात. 'Gir cow information in Marathi'
  • सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या काही भागात संपूर्ण पांढऱ्या रंगाची तसेच लालतांबूस रंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेल्या गायी आढळून येतात. यामध्ये वळूचा / बैलांचा रंग हा थोडा ठळक आढळून येतो.

आणखी वाचा: सेंद्रिय शेतीमध्ये बायोगॅस स्लरीचे महत्त्व

गीर गायीच्या रंगावरून पडलेली स्थानिक नावे

साधारण लालतांबूस व पांढरे ठिपके, पोटावर पांढरा रंग: गडकडी

  • पांढऱ्या रंगावर लाल ठिपके किंवा पिवळसर लालतांबूस रंग: काबरी किंवा कबरी
  • पिवळसर तांबूस रंग: माकडी
  • ठळक तांबूस लाल रंग: गोरी
  • लालतांबूस रंगासह पांढरी छटा: बगळी

गीर गाय कशी ओळखावी?

  • शिंगे ही खाली वळून पाठीमागे वक्र होत जातात व परत वरती जाऊन आतील बाजूस वळतात. लांबून अर्धचंद्रकार आकार दिसतो.
  • गीरच्या बाबतीत शिंगाचा उगम हा डोक्याच्या खालील बाजूपासून सुरू होतो. आकारावरून देखील मजिया, मुठीया, भीलापट्टी, कुढा या नावांनी गीर गाय ओळखली जाते.
  • कान हे लोंबकळणारे व पानासारखे वळलेली असतात. कानाचा आतील भाग नेहमी समोरून दिसतो. देशातील सर्व गायींमध्ये गीर गायीचे कान हे जवळजवळ ३० सेंटिमीटरपर्यंत लांब असतात, कानाच्या शेवटी छोटा छेद असणे हे चांगल्या जातीचे लक्षण समजले जाते.
  • गीर गायीचे डोके उलट्या भांड्याच्या आकारासारखे व कपाळ पुढे आलेले असते. चेहरा लांब व डोळे बदामासारखे असतात. पापण्यांमुळे डोळे अर्धवट मिटल्यासारखे दिसतात. डोळ्यातील जादा अंतर हा चांगला गुणधर्म समजला जातो. Gir cow information in Marathi
  • छाती मोठी व कातडी पातळ असते. कातडीवर घड्या असतात व खूप नाजूक आणि मुलायम त्वचा असते. त्वचा तेलकटसुद्धा असते. त्यामुळे तापमान नियंत्रित होते.
  • शेपटीचा गोंडा काळा व झुपकेदार असतो. काही गायींमध्ये पूर्ण जमिनीपर्यंत शेपूट असते. वशिंड हे ठळकपणे दिसते. कोणत्याही बाजूस न वळलेले वशिंड हे चांगल्या जातीचे लक्षण आहे.

वैशिष्ट्ये:

  • दुधाळ गोवंश
  • दुधातील स्निग्धांश 4 ते 6.5 पर्यंत
  • बैलांची उन्हामध्ये काम करण्याची क्षमता उत्तम
  • रंग संपूर्णपणे लाल, काळसर तांबडा, तांबड्यावर पांढरे ठिपके. मस्तक रुंद, शिंगे पूर्णतः काळी
  • कान पूर्णपणे लांबट व नाकपुडीपर्यंत येणारे
  • नाकपुडी लहान व काळी, भव्य वशिंड, मोठी कास, दुधाची शीर मोठी व नागमोडी

देशातील एकूण २१,२६,४२१ गीर जनावरांच्या संख्येपैकी महाराष्ट्रात १०७८४ गीर जनावरे आहेत. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात गीर गायींचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ब्राझील देशात या गीर गायींचे व्यवस्थित संगोपन व संकर करून गिरलैंडो नावाची जात विकसित केली आहे. सद्यस्थितीत गुजरात राज्यातदेखील पशुपालकांनी संकर करताना काळजी न घेतल्यामुळे काही ठिकाणी कांकरेजबरोबर संकर होऊन मिश्र पैदास तयार झाली आहे. जी शिंगांच्या आकारावरून ओळखून येते. काही ठिकाणी कृत्रिम रेतनाऐवजी नैसर्गिक संयोगामुळे गीर जातीच्या गायींच्या शुद्धतेत फरक जाणवू लागला आहे. त्यासाठी उच्च वंशावळीच्या गीर जातीच्या वळूपासून तयार केलेल्या वीर्यमात्रांचा वापर कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून पैदाशीसाठी करणे गरजेचे ठरणार आहे. त्यातून अधिक उत्पादनक्षम व पैदासक्षम गीर गायींचे संवर्धन आणि निर्मिती करणे शक्य होईल.

तर मित्रांनो तुम्हाला "Gir cow information in Marathi" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका!

Post a Comment

0 Comments