Solar cabinet dryer for domestics use आजच्या घडीला सौर ऊर्जेचा वापर करून पारंपरिक ऊर्जेची बचत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यावर उपाय म्हणून सौर ऊर्जेवर आधारित वाळवणी यंत्र वापरणे ही काळाची गरज आहे. सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. एक्झॉस्ट फॅन असलेले कॅबिनेट ड्रायर घरगुती वापरासाठी तसेच लघु उद्योगाकरिता फायदेशीर ठरते.

Solar cabinet dryer for domestics use
Solar cabinet dryer for domestics use

Solar cabinet dryer for domestics use

  • अलीकडील काळात प्रक्रिया उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. भारतामध्ये कृषिमालाचे काढणीनंतर नुकसान फार मोठ्या प्रमाणात होते.
  • पदार्थ जास्त काळ टिकून राहण्यासाठी अन्नपदार्थांचे निर्जलीकरण करणे अत्यंत आवश्यक असते.
  • वाळवण्याची प्रक्रिया ही एक सोपी पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीत मोकळ्या जागेत सूर्यकिरणांच्या सहाय्याने पदार्थ वाळवतात. वाळवण्याची ही पारंपारिक प्रक्रिया  नियंत्रित नसते.
  • खुल्या जागेवर अन्नधान्य वाळविल्यास पदार्थाची गुणवत्ता ढासळते, पोषणतत्त्वे कमी होतात. तसेच धूळ, पक्षी, चिमण्या, पाळीव प्राणी, किडे व उंदीर यांचा जास्त धोका उद्भवतो.
  • हाच उद्देश लक्षात ठेवून कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव जामोद जि. बुलढाणा येथे सोलर कॅबिनेट ड्रायरचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. हे तंत्रज्ञान पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असून याची क्षमता ५ किलो एवढी आहे. 'Solar cabinet dryer for domestics use'

सोलर कॅबिनेट ड्रायरची संरचना

ग्रामीण तसेच शहरी भागात कृषी माल हा साठवणुकी करीता योग्य आद्रतेपर्यंत सुकविणे आवश्यक असतोमोकळ्या जागेत उघड्या सूर्यप्रकाशावर पारंपरिक वाळवणी पद्धतीमुळे पदार्थांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. त्याच हेतूने या ड्रायरची संरचना केली आहे.
  • एकावेळेस पदार्थ वाळविण्याची क्षमता - ५ किलो
  • आयताकृती आकाराचा ड्रायर चेम्बर
  • उष्णता शोषून घेण्यासाठी पृष्ठभागावर काळ्या रंगाचे आवरण
  • ड्रायरचा आकारमान - ९६० X ५२० X ३०० मिमी.
  • यू. व्ही. स्टॅबिलायझेशन शीट Solar cabinet dryer for domestics use
  • वायुविजनासाठी पंखा क्षमता - २ वॅट
  • सोलर पॅनल - ५ वॅट

 सोलर कॅबिनेट ड्रायरची वैशिष्ट्ये

    • सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कँडी, बटाटा चिप्स, टोमॅटोचे काप, हिरवा भाजीपाला वाळविता येतो.
    • सोलर कॅबिनेट ड्रायरमध्ये दिवसा 'ग्रीन हाउस इफेक्ट'मुळे आतील तापमानात वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस जास्त वाढ होते.
    • ड्रायरमधील तापमान ६० ते ६५ अंश सेल्सिअस पर्यंत पोचते.
    • वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला / फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.
    • ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.
    • ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते.
    • बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.
    • १०० टक्के विजेची बचत करणे शक्य.
    • लघु उद्योगाकरिता याचा वापर करता येतो.
    • धूळ, पक्षी, चिमण्या, पाळीव प्राणी, किडे व उंदीर यांच्या त्रासापासून सुटका.
    • ड्रायर मध्ये वळवलेल्या पदार्थाची चव, स्वाद रंग व गुणवत्ता तशीच टिकून राहते.
    • गृहीणी, लघुउद्योजक  तसेच महिला स्वयंसहाय्यता समूहासाठी हे ड्रायर अत्यंत फायदेशीर आहे.
    मित्रांनो तुम्हाला माझा "Solar cabinet dryer for domestics use" हा लेख कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.