बायोगॅस संयंत्राची काळजी व देखभाल - Care and Maintenance of Biogas Plant

Care and Maintenance of Biogas Plant शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत आहे. बायोगॅस संयंत्र हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान ठरत आहे मग त्यासाठीच आपण या लेखात बायोगॅस संयंत्राची कशी देखभाल करावी हे पाहूया.

Care and Maintenance of Biogas Plant
Care and Maintenance of Biogas Plant

बायोगॅस हे अपारंपरिक ऊर्जेचा स्त्रोत असून एक स्वच्छ व स्वस्त इंधन आहे. याचा वापर हा मुख्यत: स्वयंपाकासाठी केला जातो. संयंत्रातून निघणारी स्लरी ही सेंद्रीय शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

या स्लरीमध्ये दोन टक्के नत्र, एक टक्का स्फुरद व एक टक्का पालाश असते. तसेच ह्युमसचे देखील प्रमाण चांगले असते.

बायोगॅस संयंत्राचे प्रामुख्याने दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये तरंगते वायुपात्र असलेले (केव्हीआयसी) आणि स्थिर घुमट असलेले (जनता व दीनबंधू) प्रकारचे सयंत्र आहेत.

Care and Maintenance of Biogas Plant

बायोगॅस संयंत्राचे बांधकाम सुरु असतांना किंवा उभारणी करतांना घ्यावयाची काळजी:

  • बांधकाम नियोजन करून खड्डा खोदण्यास सुरु केल्यापासून जनावराचे शेण वेगळे गोळा करण्यास सुरुवात करावी. जेणेकरून बांधकाम पूर्ण होईपर्यंतच्या ३० ते ४० दिवसात सुरुवातीला भरावयाचे शेण उपलब्ध होईल. 'Care and Maintenance of Biogas Plant'
  • संयंत्राच्या बांधकामावर १५-२० दिवस पाणी टाकावे. बांधकाम पक्के होईल.

उभारणी पूर्ण झाल्यावरघ्यावयाची काळजी:

  • सुरुवातीचे शेण व त्यामध्ये तितकेच पाणी मिसळून संयंत्राला एक किंवा दोन दिवसात पूर्ण भरावे. थोडे थोडे भरत जावू नये.

सयंत्राची देखभाल व दुरुस्ती:

  • दररोज ठरलेल्या प्रमाणात शेण पाणी मिश्रण प्लँट मध्ये घालीत जावे.
  • शेणटाकी मधील गाळ कुंडीतील साचलेले दगड, माती काढून शेणटाकी रोज स्वच्छ करावी.
  • इनलेट व आउटलेट मधून खत वाहत नसेल तर तो भाग बांबूने मोकळा करावा. 
  • मुख्य गॅस कॅप रोज रात्री बंद करावे. Care and Maintenance of Biogas Plant
  • गॅस शेगडी पेटविताना प्रथम आगकाडी पेटवावी नंतर गॅस कॉक चालू करावा. 
  • गॅसची स्वच्छता करताना मुख्य कॉक बंद करून शेगडी काढावी. नोझल व पाईप तारेने साफ करावेत.
  • गॅसची ज्योत निळी दिसत असली किंवा शेगडीत डबडब असा आवाज येत असेल तर पाईप मध्ये पाणी झाले असे समजून मुख्य कॉक बंद करावा. 'टी' पाईपचे बूच खोलून पाणी काढावे. पुन्हा बूच लावावे.
  • गॅस ज्वाला नोझलला चिटकून १ १/२ ते २” इंच उंचीच्या याव्यात. यापेक्षा उंच ज्वाला येत असतील तर ऑक्सिजन कमी जास्त करणारी चकती मागे पुढे सरकवून ज्वाला योग्य उंचीच्या ठेवाव्यात.
  • काही कारणाने गॅस खुला राहील्यास त्याच्या तीव्र वासाने गॅस मोकळा राहिल्याची जाणीव होते. अशा वेळी प्रथम दरवाजा खिडक्या उघडून गॅस बाहेरील हवेत जाऊ द्यावा. गॅस हवेपेक्षा हलका असल्याने तो लगेच दरवाजा-खिडक्यातून निघून जाईल.
  • हंगामानुसार गॅस ठरलेल्या प्रमाणात तयार होतो. हे लक्षात घेऊन गॅसचा वापर काटकसरीने करावा. गॅस वाया जाऊ देऊ नये.

संयंत्रातून अधिक गॅस कसा मिळवावा?
  • शक्यतोवर प्लँटवर १२ तास उन पडेल अशी जागा निवडावी.
  • जागा मुरबाड अगर चुनखडीची असल्यास त्या ठिकाणी बायोगॅस प्लँट बांधावा.
  • प्लँटची खोली शक्यतोवर कमी असावी.
  • बायोगॅस प्लँटला आतून प्लास्टर करावे. पार्टीशन भिंत असल्यास ती कमी जास्त जाडीची असावी. म्हणजे प्लँटमध्ये जिवाणू अधिक राहतील.

बायोगॅस प्लँटमधील दोष निदान व दुरुस्ती

गॅस कमी मिळण्याची कारणे:
  • ठरलेल्या प्रमाणात दररोज शेण न घालणे
  • शेणामध्ये कमी अगर अधिक प्रमाणात पाणी घालणे
  • शेणामध्ये गुराचे मूत्र अधिक प्रमाणात मिसळणे
  • बायोगॅस प्लँटमधील मिश्रणात काही कारणाने सामूचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे
  • गॅस टाकीला बारीक भोके पडून त्यामधून गस निघून जाणे
  • थंडीच्या दिवसात बॅक्टेरियाची संख्या कमी होणे
  • प्लँटमध्ये साबण फिनाईल आम्ल इत्यादी जंतुनाशके टाकणे धोक्याचे आहे
  • गॅस टाकीचे वजन ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी अधिक असणे
  • गॅस वाहक पाईप कमी व्यासाचा आणि प्रमाणापेक्षा जास्त लांबीचा असणे
  • पाईप वेडावाकडा बसविल्याने त्यामध्ये वाफेचे पाणी साचत राहणे

बायोगॅस प्लँट नादुरुस्त का होतो?
  • पाया भरणी पुरेशी न झाल्यास
  • काँक्रीट मिश्रण योग्य प्रमाणात न झाल्यास
  • ठरलेल्या मापात बांधकाम न झाल्यास
  • बांधकामात किमान दोन ते तीन आठवडे पाण्याचा वापर न झाल्यास
  • बांधकामात वापरावयाचे समान चांगल्या प्रतीचे न वापरल्या गेल्यास
  • बांधकाम करणारा गवंडी पुरेसा कुशल कसबी नसल्यास
  •  बांधकामच्या बाजूने वाळू, दगड, विटाचे तुकडे, मुरूम, पाणी यांचे मिश्रण भरून जमीन व बांधकाम यामधील मोकळी जागा न भरल्यास प्लँट फुटण्याचा धोका असतो.
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा "Care and Maintenance of Biogas Plant" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

No comments:

Post a Comment