एकात्मिक कीड नियंत्रणासाठी तांत्रिक उपाययोजना: Technical Solution for Integrated Pest Management

Technical Solution for Integrated Pest Management शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. विषारी कीटकनाशकांमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी कीडनियंत्रणाचे कोणते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे त्यासाठीची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

पिक संरक्षण हा शेती व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. पिकांवर विविध किडीचा प्रादुर्भाव होत असतो. निसर्गामध्ये काही मित्र किडे तर काही शत्रू किडे असतात. नुकसानकारक किडींमुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट येते. कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतीमध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.   शत्रू किडींच्या व्यवस्थापनासाठी पर्यावरणाचा समतोल राखून एकात्मिक कीड नियंत्रण केले जाते. त्यामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि तांत्रिक अशाप्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. तांत्रिकदृष्ट्या किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याकरीता वेगवेगळ्या सापळ्यांचा वापर अवश्य करावा.

कीडनियंत्रणासाठी वापरल्या जाणारे सापळे

कामगंध सापळा (फेरोमोन ट्रॅप): 

Technical Solution for Integrated Pest Management
Technical Solution for Integrated Pest Management
  • मादी कीटक स्वजातीय नर कीटकाला आकर्षित करण्यासाठी व नरासोबत संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनीक गंध सोडतात, यालाच कामगंध किंवा प्रलोभन (फेरोमोन) असे म्हणतात. 'Technical Solution for Integrated Pest Management'
  • वेगवेगळ्या किडींचा ल्यूर (कामगंध) हा वेगवेगळा असतो. अशा प्रकारची कृत्रिम कामगंध सापळे कृषी शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. लैंगिक कामगंधाचे हळूहळू बाष्पीभवन होऊन ते हवेत पसरतात.
  • संबंधित नर व मादीमध्ये संदेश वहनाचे कार्य सुरु होऊन ते मिलनासाठी उत्तेजित होतात आणि लैंगिक प्रलोभानाकडे आकर्षिले जातात आणि सापळ्यात अडकून मारले जातात. एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावेत.

वोटा ट्रॅप:
Technical Solution for Integrated Pest Management
Technical Solution for Integrated Pest Management

  • या सापळ्यांचा वापर हा वांग्याच्या झाडावरील फळ पोखरणाऱ्या अळीसाठी ट्युसीन ल्युर, कोबीमधील गड्डा पोखरणाऱ्या अळीसाठी डीबीएम ल्युर, उसावरील खोडकिडीसाठी ईएसबी ल्युरचा वापर केला जातो.
  • हे सापळे छत्रीच्या आकाराचे असतात. या सापळ्यांमध्ये खाली पिवळ्या रंगाच्या पिशवीत पाणी आणि गोडेतेल असते. त्यात पतंग पडतात आणि मरतात. जमिनीपासून २ फुटावर काठीच्या आधाराने एकरी १६ सापळे लावावेत.

फनेल सापळा (ट्रॅप):
Technical Solution for Integrated Pest Management
Technical Solution for Integrated Pest Management

  • हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबीनवरील लष्करी अळी, टोमॅटोच्या झाडावरील फळ पोखरणारी अळी, कपाशीवरील शेंदरी बोंड अळी, ढोबळी मिरचीवरील फळ पोखरणारी अळी, सुर्यफुल व भूईमुगावरील पाने कुरतडणारी अळी आदींच्या नियंत्रणासाठी फनेल सापळा वापरतात.
  • पिक फुल अवस्थेत येण्यावेळी एकरी १० ते १२ फनेल ट्रॅप उभारावेत.

रक्षक सापळे:
  • प्रामुख्याने वेलवर्गीय फळे व आंब्यावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरतात.
  • फळमाशी हे काकडी, कलिंगड, खरबूज, दुधीभोपळा, दोडके, कारले, गिलके, पेरू आणि आंबा पिकांचे नुकसान करते.
  • फळमाशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकरी ४ ते ६ रक्षक सापळे विखुरलेल्या पद्धतीने लावावेत. तसेच वापरत असलेले कॅप्सूल दर १५ दिवसांनी बदलावे.

कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी:

  • कीटक निहाय संपल्याची निवड करावी. सापळ्यात अडकलेले पतंग २ ते ३ दिवसांनी काढून नष्ट करावेत.
  • सापळ्यांमधील कॅप्सूल दर १५ ते २० दिवसांनी बदलावेत. Technical Solution for Integrated Pest Management
  • सापळा हा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून २ ते ३ फुटावर राहील याची काळजी घ्यावी.
  • सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा ज्यामुळे लिंग प्रलोभन (कॅप्सूल) रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील.

कामगंध सापळ्यांच्या वापराचे फायदे:

  • फेरोमोन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्या वेळी कीड व्यवस्थापन पद्धती ठरविता येते तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते.
  • एकत्रित कामगंध सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांच्या किंमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो. या रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.
  • रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे परोपजीवी कीटक व मित्र कीटक सुरक्षित सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
  • कीड व्यवस्थापनाची ही पद्धत वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे. सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या किंमतीपेक्षा खूप कमी आहे.
  • सापळ्यांच्या वापरामुळे मानव, पशु, पक्षी, प्राणी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो.
चिकट सापळे:
Technical Solution for Integrated Pest Management
Technical Solution for Integrated Pest Management

  • रसशोषक कीडी विशिष्ट प्रकारच्या रंगाकडे आकर्षित होतात. जसे की फुलकिडे निळ्या रंगाकडे आकर्षित होतात तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी हे पिवळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात. याच तत्वाचा वापर करून रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवले जाते.
  • भाजीपाला पिकामध्ये तसेच अन्य पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी पिवळ्या किंवा निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरावे.
  • सापळ्यावर असलेल्या चिकट द्रव्यामुळे या कीडी चिकटून मरतात. पिवळे किंवा निळे सापळे घरच्या घरी स्वस्तात बनविता येतात . यासाठी अर्धा ते एक फूट आकाराचा पिवळा किंवा निळ्या रंगाचा जड प्लास्टिक पेपर अथवा पुठ्ठा घ्यावा. त्याला दोन्ही बाजूने ग्रीस, एरंड तेल, चिकट द्रव्य किंवा गोडे तेल लावावे. असे चिकट सापळे पिकाच्या उंचीवर दोरीने बांधून घ्यावेत.
  • रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी एकरी १५ ते २० चिकट सापळे लावावेत.
 
प्रकाश सापळा:
Technical-Solution-for-Integrated-Pest-Management1
Technical-Solution-for-Integrated-Pest-Management1

  • सर्वात जास्त प्रभावशाली म्हणून या सापळ्याची ओळख आहे. अळीवर्गीय कीडी जसे की तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी, उंट अळी, केसाळ अळी, अमेरिकन बोंड अळी, पांढरी माशी, काळी माशी यांचे पतंग हे निशाचर असतात.
  • त्यांची कार्यक्षमता रात्रीच्या वेळी जास्त असते. हे पतंग रात्रीच्या वेळी मिलनासाठी आणि अंडी घालण्यासाठी बाहेर पडतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यांच्या या गुणधर्माचा वापर करून पतंगाचे नियंत्रण केले जाते. त्यामुळे पुढे जन्म घेणाऱ्या किडीच्या पिढ्याच कमी होतात.
  • प्रकाशाकडे या किडीचे पतंग आकर्षित होऊन सापळ्याच्या नरसाळ्यातून खाली पिशवीत किंवा डब्यात पडून मरतात. सध्या मार्केटमध्ये विजेवर चालणारे प्रकाश सापळे मिळतात.
  • शेतामध्ये असलेला विजेचा तुटवडा व होणारी जीवितहानी याच्या शक्यतेमुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या प्रकाश सापळ्याचा शोध लावला आहे. त्याबद्दल सर्विस्तर माहिती पुढील अंकात पाहूया.
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा "Technical Solution for Integrated Pest Management" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

Post a Comment

0 Comments