Charcoal from Cotton Residue मित्रांनो, सद्यःस्थितीत दिवसेंदिवस बेरोजगारी डोके वर काढत आहे त्यातच कुठला व्यवसाय करावा हा अत्यंत बिकट प्रश्न सध्या सर्वांना पडत आहे. या लेखात मी आपल्यासाठी पर्यावरणपूरक अशा व्यवसायाबद्दलची माहिती घेऊन आलो आहे. हा लेख आवडल्यास इतरांना जरूर शेअर करावा.
![]() |
| Charcoal from Cotton Residue |
आजच्या एकविसाव्या शतकात पारंपारिक इंधनाचे साठे संपुष्ठात येत आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
महाराष्ट्र राज्य हे कपाशी लागवडीसाठी देशात अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रात सरासरी २.८ दशलक्ष हेक्टर जमीन कपाशी लागवडीखाली येते.
राज्यातील विदर्भ तसेच खानदेश व मराठवाडा या प्रदेशात सर्वात जास्त कपाशीचे पिक घेतल्या जाते.
Charcoal from Cotton Residue
कापुस वेचणी झाल्यावर शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न हा पऱ्हाट्यांच्या विल्हेवाटेचा असतो.
अनेक शेतकरी ह्या पऱ्हाट्या शेतात जाळून नष्ट करतात व काहीजण इंधन म्हणून वापर करतात. जाळून टाकल्याने वायुप्रदूषण होते तसेच मातीतील सूक्ष्मजीव मरून जातात त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. 'Charcoal from Cotton Residue'
शेताच्या कडेला पऱ्हाट्या गोळा केल्याने त्यावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव पुढील हंगामातील पिकांवर होऊ शकतो. अशाच टाकाऊ पऱ्हाट्यांपासून टिकाऊ इंधन तयार करता येते.
एका एकरामध्ये जवळ जवळ ६ क्विंटल पऱ्हाट्या मिळू शकतात. या पऱ्हाट्या वापरून चार सदस्यांच्या कुटुंबासाठी किमान चार ते पाच महिने लागणारा कांडीकोळसा तयार करता येतो. या व्यतिरिक्त इतर पिकाच्या काडीकचऱ्याचाही वापर करून वर्षभर कांडीकोळसा उद्योग चालवता येणे शक्य आहे.
कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान:
केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथील शास्त्रज्ञांनी शेतीतील पिकाचे अवशेष तसेच काडीकचरा वापरून कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये कोळसा तयार करण्यासाठी लागणारी भट्टी तसेच कांडीकोळसा बनविण्याचे यंत्र आणि चूल तयार केली आहे.
कोळसा तयार करण्याची भट्टी:
- ही एक लोखंडी पिंपासारखी भट्टी असून तिला मधोमध एक झडप असते.
- कोळसा तयार करण्यासाठी यात पऱ्हाट्या बारीक करून आत मध्ये टाकव्या.
- निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर ते पेटवून द्यावे व झडप बंद करावी. त्यामुळे भट्टीत जितका ऑक्सिजन आहे तोपर्यंत पऱ्हाट्या जळून कोळसा तयार होतो. Charcoal from Cotton Residue
- ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा.
कांडीकोळसा तयार करण्याचे यंत्र:
- भट्टीत तयार झालेला कोळसा शेणामध्ये कालवून हे मिश्रण यंत्रामध्ये टाकतात.
- हे यंत्र स्क्र्यूप्रेस तंत्रज्ञानावर चालते.
- कोळसा व शेण एकत्र केलेले मिश्रण स्क्रूच्या सहाय्याने यंत्रामध्ये पुढे ढकलले जाते.
- यंत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गोलाकार नळीतून प्रेस होऊन कांडी कोळसा बाहेर येतो.
चूल:
- तयार झालेला कांडी कोळसा हा आपण चुलीत जाळू शकतो. परंतु तो एकूण क्षमतेने जाळावा व जास्त उष्णता प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट चूल तयार करण्यात आली आहे.
- या चुलीमध्ये दोन जाळ्या बसवलेल्या असून त्या जाळ्या बसवलेल्या असून त्या जाळ्या मध्ये हा कोळसा भरतात.
- या चुली खाली कागद पेटवून ठेवतात. त्यामुळे कोळसा पेट घेतो.
- कोळसा पेटल्यावर लाल निळसर रंगाची ज्योत मिळते.
- चार माणसाचा स्वयंपाक बनविण्यासाठी सरासरी ४०० ते ५०० ग्रॅम कोळसा लागतो.
फायदे :
- पऱ्हाट्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येते.
- कापसाच्या पऱ्हाट्या जाळल्याने होणारे वायुप्रदूषण कमी करता येते.
- स्वस्त, सोपे आणि पर्यावरणासाठी हानिकारक नसलेले जैविक इंधन ग्रामीण भागात सहज तयार करता येते.
- ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होते.
तर मित्रांनो तुम्हाला माझा "Charcoal from Cotton Residue" हा लेख कसा वाटला?
आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

0 Comments