Solar Energy Based Light Trap for Pest Control शेतकरी मित्रांनो, एकात्मिक कीड नियंत्रणासाठी तांत्रिक उपाययोजना या लेखात आपण कीडनियंत्रणासाठी वापरल्याजाणाऱ्या वेगवेगळ्या सापळ्यानंविषयी माहिती घेतली. या लेखात आपण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने शिफारस केलेल्या सौरऊर्जाचलीत प्रकाश सापळ्या बद्दल माहिती जाणून घेऊया.
Solar Energy Based Light Trap for Pest Control |
महाराष्ट्र राज्य हे कपाशी लागवडीसाठी देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागांत कपाशीचे पीक हे रोख पीक म्हणून घेतले जाते.
महाराष्ट्र राज्यात एकूण क्षेत्रफळापैकी 40 लाख हेक्टर जमीन ही कपाशी पिकाच्या लागवडीखाली आहे. राज्यात 96% पेक्षा जास्त शेतकरी बीटी बियाणे पेरतात, जे बियाणे बोंडअळीच्या हल्ल्यांना अनुकूल ठरले होते आणि त्यामुळे कापूस उत्पादनात भरपूर घट झाली होती.
कपाशीच्या पिकावरील कीडींच्या (बोंडअळी ) आक्रमणामुळे विदर्भ आणि मराठवाडा मधील 20 जिल्ह्यातील 8 लाख हेक्टर जमिनीत प्रचंड हानी पोहचली होती. यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनातून खूप उपाययोजना केल्या गेल्या.
हे पण वाचा- एकात्मिक कीड नियंत्रणासाठी तांत्रिक उपाययोजना
सध्या कीड नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकांचा वापर करण्याची पद्धत आहे. हे उपाय एवढे प्रभावशाली ठरत नाहीत. आजकाल बाजारात खूप विषारी कीटकनाशके येत आहे ज्यामुळे जीवितहानी होत आहे. लोकांना विषमुक्त अन्न, फळ, भाजीपाला मिळावा म्हणून आता खूप उपाययोजना चालू आहेत. तांत्रिकदृष्ट्या काही उपाययोजना कराव्या लागतात. त्यासाठीच पिकांमध्ये पारंपारिक सापळा वापरण्याची पद्धत आहे. जसे की फेरोमोन ट्रॅप, चिकट सापळा, फनेल ट्रॅप, इलेक्ट्रिक लाईट ट्रॅप आदी.
सौरऊर्जाचलीत प्रकाश सापळा (Solar Insect Light Trap:
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, येथील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर ऊर्जेवर चालणारे कुठल्याच प्रकारच्या इंधनावर किंवा विजेवर अवलंबून नसलेले परिणामी अल्ट्रा व्हायोलेट लाईटच्या प्रकाशावर पिकातील प्रौढ किटकांचे पतंग आकर्षित करण्यासाठीचे तंत्रज्ञान सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप विकसित केले आहे. 'Solar Energy Based Light Trap for Pest Control'
- आपल्या शेतातील किडींना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते. रात्री मिलनासाठी व अंडी घालण्यासाठी हे पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतात.
- काळाची गरज आणि मर्यादित असलेले पारंपारिक ऊर्जा स्त्रोत याचा विचार करून सौर ऊर्जेवर आधारित प्रकाश सापळा किडींसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
- सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप हे तंत्रज्ञान विविध किडींचे पतंग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच या तंत्रज्ञानाचा वापर सेंद्रिय शेती पद्धतीत करून जैविकदृष्ट्या कीडनियंत्रण करता येते.
सौरऊर्जाचलीत प्रकाश सापळ्याची वैशिष्ट्ये:
- सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे यंत्र आहे. यासाठी संयंत्रातील बॅटरी ही सोलर फोटोहोल्टाइक पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते.
- यामध्ये सोलर फोटोहोल्टाइक पॅनल, सोलर चार्ज कंट्रोलर आणि पॅनलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी सिल्ड लीड ऍसिड बॅटरी, अल्ट्रा व्हायोलेट लाईट, फनेल, कीटक पात्र आणि स्टँड वापरण्यात आले आहे. Solar Energy Based Light Trap for Pest Control
- ट्रॅपमधून निघणारा विशिष्ट प्रकाश हा विशिष्ट किडींना आकर्षित करतो.
- किडींच्या जन्मदाता पतंगांना मारण्याची क्रिया रोज होत असल्यामुळे त्यांची पुढची पिढीच नष्ट होते.
- हा ट्रॅप पूर्णतः स्वयंचलित असून पहाटे २ तास व रात्री ४ तास आपोआप सुरु व बंद होतो.
- सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप हा पिकाच्या उंचीनुसार १० फुटापर्यंत कमीजास्त करता येतो.
- एक सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप हा २ एकर क्षेत्रापर्यंत कार्य करू शकतो.
- यामध्ये अल्ट्रा व्हायोलेट लाईटद्वारे मिळणाऱ्या प्रकाश लहरीमुळे यशस्वीपणे किडींवर नियंत्रण ठेवता येते.
- एकदा खरेदी केलेला ट्रॅप वर्षनुवर्षे चालतो व कीडनियंत्रण करतो त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या फवारणीच्या खर्चात बचत होते. परिणामी निसर्गाचा समतोल राखला जातो.
- सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप विविध पिकांकरीता जसे बागेत, फळबागेत, शेडनेट, भाजीपाला पिकात तसेच प्रामुख्याने कपाशी पिकामध्ये वापरता येते.
वापर व देखभाल:
- सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप शेताच्या मध्यभागी ठेवावा.
- स्टँडच्या मधोमध एक मोठा लोखंडी खिळा ठोकावा व त्यावर स्टँड ठेवावे.
- ट्रॅपची उंची ही पिकाच्या उंचीपेक्षा १ ते २ फुट जास्त ठेवावी.
- ट्रॅप शेतात ठेवल्यानंतर इलेक्ट्रोनिक सर्किट वरील बटन सुरु करावे.
- कीटक भांड्यात ५ ते ६ लीटर पाणी भरावे व त्यात १० ते १५ मिली केरोसीन किंवा तेल टाकावे जेणेकरून पतंग भांड्यात पडल्यावर भाहेर निघणार नाहीत व चिकटून मरून जातील.
- पात्रातील कीडे दररोज जमा करून मातीत गाडावे व आठवड्यातून एकदा किंवा आवश्यकता भासल्यास पात्रामध्ये पाणी भरावे.
- सोलर पॅनल नेहमी स्वच्छ ठेवावे.
- शेतातील पिकाची काढणी झाल्यावर इलेक्ट्रिक सर्किट वरील बटन बंद करून ठेवावे.
- इतर वेळी ट्रॅपचे काम नसल्यास तरी सुद्धा बॅटरी नेहमी चार्जिग करत राहावी जेणे करून ट्रॅप वर्षानुवर्षे सुरळीत चालू राहील.
0 Comments