Solar Energy based Drip Irrigation System शेतकरी मित्रांनो, कृषिपंपांना दिवसा मिळणारा अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या भारनियमावर सोलर वॉटर पंप हा उत्तम पर्याय आहे. परंतु सौरऊर्जेवर ठिबक सिंचन यंत्रणा कशी वापरावी याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
ठिबक सिंचनामुळे होणाऱ्या पाणी आणि ऊर्जा बचतीविषयी आपण सारेजण ज्ञात आहोतच. पण त्याच बरोबर आज होणाऱ्या विजेच्या अपुरतेमुळे ठिबक सिंचन यंत्रणा पूर्ण कार्य क्षमतेने वापरणे शक्य होत नाही.
दुर्गम भागात विजेची समस्या अधिकच बिकट आहे. ठिबक सिंचन ही दाबावर आधारीत यंत्रणा असल्यामुळे पंपाचा वापर अनिवार्य ठरतो. म्हणूनच विजेला पर्याय म्हणून शेतकरी डिजेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या पंपाकडे वळतात. पण या पंपाचा वापर खूप खर्चीक आहे. तसेच या पपांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल देखील बिघडतो.
सौर ठिबक सिंचन यंत्रणा खास करून ज्या शेतकऱ्याकडे आज वीज पोहोचली नाही किंवा ज्या ठिकाणी नियमीत वीज नसते अशास अत्यंत उपयोगी आहे. आज होणाऱ्या विजेच्या त्रासापासून या यंत्रणेच्या वापरामुळे नक्कीच सुटका होईल यात शंका नाही.
Solar Energy based Drip Irrigation System |
सौर ठिबक सिंचन यंत्रणेची कार्यपद्धती:
- सकाळी ऊन कमी असल्यामुळे हा पंप नेहमीपेक्षा कमी कार्यक्षम असतो.
- अर्थातच ठिबक सिंचन यंत्रणेतून वाहणारा पाण्याचा प्रवाह देखील कमीच असतो.
- दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते म्हणूनच पाण्याचा प्रवाह देखील जास्त असतो. यावेळेस जमीन आणि झाडातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा दर ही वाढलेला असतो.
- अशावेळी वाढीव पाण्याची गरज सौर पंप भरपूर पाणी देऊन भागवतो म्हणूनच ठिबक सिंचनासोबत सौर पंप वापरल्यामुळे जमिनीतील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होते. यामुळे पिकाची समान व योग्यरीत्या वाढ होण्यास मदत होते. 'Solar Energy based Drip Irrigation System'
- साधारणत: सौर पंप ६ – ८ तास चालतो. गरज भासल्यास सौर पंपातून मिळणारे पाणी उंचावर टाकीत साठवून ठेवता येऊ शकते. आवश्यकतेनुसार टाकीतून पाहिजे तेवढा पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.
सौर ठिबक यंत्रणेचे फायदे:
- सूर्यापासून मिळणाऱ्या अपारंपरिक उर्जेचा वापर केला जातो
- व्हेंच्युरीद्वारे पाणी आणि खते हळूहळू ठिबक यंत्रणेमार्फत जास्तवेळ सौर पंपाने दिली जातात. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहून उत्पनात वाढ होते
- कमी पाउस, दुष्काळामध्ये सिंचन करण्यासाठी उपयुक्त Solar Energy based Drip Irrigation System
- पारंपरिक उर्जा स्रोतांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही
- वीज आणि इंधनाचा कुठलाच खर्च यामध्ये येत नाही
सौर ठिबक यंत्रणेतील प्रमुख घटक:
- सरफेस / सबमर्सिबल सौर पंप
- सोलर पंप कंट्रोलर
- सोलर पॅनल
- सोलर ट्रॅकर
- ठिबक सिंचन यंत्रणा
- वीजप्रतिरोधक यंत्रणा
0 Comments