Magel Tyala Saur Krushi Pump Yojana |
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी २७ हजार कोटी रुपयांची मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० टक्के तसेच अनुसूचित जाती - जमातींसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के रक्कम भरून सोलर पॅनेलसह पंप सेट देण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांयोजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
मागेल त्याला सौर कृषि पंप योजना
आपल्या राज्यातील शेतकरी बंधूंनी पूर्वापार आपल्या शेतीमधून जास्तीतजास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने सिंचनासाठी अगदी डिझेल पंपापासून ते वीजपंपापर्यंत अनेक प्रकारचे पंप अत्यंत कार्यक्षमरीत्या वापरले आहेत. त्यामुळे लवकरच शेतकरी बांधव हे तंत्रज्ञान आत्मसात करतील यात दुमत नाही.
सौर पंप स्वस्त होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रोत्साहनपर योजना आणल्या असून देशातील व परदेशातील क्षेत्रातील उत्पादक देखील हे तंत्र शेतकऱ्यांना कसे परवडेल या प्रयत्नात आहेत.
मुंबई येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणच्या नोंदणी वेबपोर्टलचे उद्घाटन, पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले. महाराष्ट्रातील शेतक-यांना सिंचनासाठी १० लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाचे आहे. 'Magel Tyala Saur Krushi Pump Yojana'
हे पण वाचा: सौर कृषि पंप - Solar Pumps for Agriculture
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय करण्यासाठी स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना फक्त १०% रक्कम भरून सौर पॅनेल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळेल.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५% आहे.
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदानित आहे
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पंप देण्याची योजनेमध्ये तरतूद
- विम्यासह पाच वर्षांची दुरुस्ती हमी Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
- वीज बिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध
लाभार्थी निवडीसाठीचे निकष
- २.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ३ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी क्षमतेचे आणि ५ एकरपेक्षा जास्त जमीन धारक शेतकऱ्यांना ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप देण्याची योजनेमध्ये तरतूद.
- तसेच, शेतकऱ्यांनी पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपांची मागणी केल्यास ते अनुज्ञेय असेल.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेत तलाव, विहिरी, बोअरवेलचे मालक आणि बारमाही नद्या/नाल्यांच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र असतील.
- ज्या शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहीर, नदी इ.मधील पाण्याचे स्त्रोत सुनिश्चित केले आहेत ते महावितरण खात्री करेल.
- तथापि, जलसंधारणाच्या कामांच्या जलसाठ्यांमधून पाणी काढण्यासाठी या पंपांचा वापर करता येणार नाही.
- ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही, ते देखील या अभियानांतर्गत लाभासाठी पात्र असतील.
- ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही अशांना प्राधान्य
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- ७/१२, ८ अ (सातबारा उताऱ्यावर विहीरीची नोंद आवश्यक)
"Magel Tyala Saur Krushi Pump Yojana" योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
1 Comments
Nice
ReplyDelete