सौर कृषि पंप - Solar Pumps for Agriculture

Solar Pumps for Agriculture शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात सौर कृषि पंपांविषयी अनेक प्रश्न सातत्याने येत राहतात. त्यांना अनुसरून अधिकाधिक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न आज मी या लेखात करणार आहे.

शेतकरी बांधवांनो, अलीकडे सौरऊर्जेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची विस्तृत मालिका उपलब्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने सौर जलताप यंत्र, सौरकंदील, सौर घरगुती दिवे, सौर कुंपण, सौर पथदिवे, सौर कृषिपंप, सौर हातपंप, सौर नॅनोपंप, तसेच सौर विद्युत प्रकल्प अशा विविध उपकरणांचा समावेश आहे. 

साधारणतः दोन दशकांपूर्वी सौर उपकरणांची किंमत जास्त होती. ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. अलीकडील काळात मात्र किमती कमी झाल्यानंतर त्यांच्या वापरास गती मिळाली. सौरऊर्जा मालिकेतील उपकरणांपैकी सौर कृषिपंप, तसेच विद्युत प्रकल्पांना सध्या अधिक मागणी आहे.

Solar Pumps for Agriculture
Solar Pumps for Agriculture

सौर ऊर्जेविषयी थोडक्यात जाणून घेऊया

पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचे मूळ जन्मस्थान सौरऊर्जा हेच आहे. हवा, ऊन, पाणी एवढेच नव्हे, तर सर्व प्रकारची खनिजे, कोळसा आदी ऊर्जास्रोतांचे मूळ जन्मस्थान सौरऊर्जाच आहे. 

सूर्यप्रकाश म्हणजे ऊर्जा, एखाद्या काळ्या रंगाची वस्तू उन्हात ठेवा आणि हात लावून पाहा, कसा चटका बसतो ते! एखाद्या वस्तूचे तापमान वाढवण्यासाठी एखादी ज्वलनशील वस्तू जाळून उष्णता निमार्ण करावी लागते.

लाकूडफाटा, तेल, कोळसा यापैकी काहीही न जाळता त्या वस्तूत आलेली उष्णता म्हणजेच सूर्यप्रकाशातील सौरऊर्जा! उदा. सूर्यप्रकाशाचे विजेत रूपांतर करण्याचे कार्य 'सोलर सेल्स' करतात. हे सेल्स उच्च गुणवत्तायुक्त सिलिकॉन वेफर्सपासून तयार केले जातात. अनेक सोलर सेल्स एकत्र जोडून सोलर मॉड्यूल अथवा सोलर पॅनल तयार केले जाते. या पॅनलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे रूपांतर आपल्याला शेतीपंपासाठी आवश्यक विजेमध्ये केले जाते. 'Solar Pumps for Agriculture'

पंपाच्या अश्वशक्त्तीनुसार (एचपी) किती सौरऊर्जा निर्माण करावी लागेल, या प्रमाणात सोलर पॅनलची संख्या निश्चित केली जाते. कोणतीही ऊर्जा मोजण्याचे युनिट असते. उदा. वीजपंप किती एचपीचा आहे, असे आपण म्हणतो. तसे सौरऊर्जेचे युनिट हे वॅट किंवा किलोवॅट असते.

अधिक वाचाSolar Energy based Drip Irrigation System

सौर पंपाबद्दल असलेल्या शंका व समाधान

  • सौरपंप म्हणजे नेमके काय?

सूर्याच्या किरणांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून जलाशयातून पाणी उपसण्यासाठी जी यंत्रणा (मोटरपंप सेट व कंट्रोलर आदी) वापरली जाते त्या यंत्रणेला सौरपंप असे म्हणतात.

  • सौरपंप कुठे वापरता येईल?

साधारणपणे जिथे वीज मंडळाचे 'कनेक्शन' उपलब्ध नसते अशा ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सौरऊर्जेद्वारे वीज पुरवता येते. यात बॅटरीचा वापर न करता सौरपंप उपलब्ध सौरऊर्जेनुसार चालतो.

  • किंमत व क्षमता काय आहेत?

किमत साधारणपणे एक लाख २५ हजार रुपये प्रतिएचपी असते. ही किमत पंपाची क्षमता, दाब, दिवसाकाठीचा प्रवाह, सौरऊर्जेनुसार संचाचे ट्रॅकिंग व ठिकाण आदी घटकांवर अवलंबून असते. सौर कृषिपंप एक एचपी ते ५० एचपी या क्षमतेपर्यंत पुरविता येतो. Solar Pumps for Agriculture

डीसी प्रकारचा सौरपंप पाच एचपी, तर एसी प्रकारचा पंप त्यापुढे देता येतो. डीसी सौरपंप जास्त कार्यक्षम असल्याने विशेषतः सौरऊर्जेवर चालविण्यासाठी उपयुक्त ठरतो. 'ऑन ग्रीड' प्रकारचे सौर विद्युत प्रकल्प अधिक प्रचलित

आहेत. त्यांची क्षमता ६० ते ७० वॉट असून, घराच्या वर किंवा एखाद्या ढाच्यावर ते उभारले जाऊ शकतात. एचपी क्षमतेनुसार त्यांच्या किंमती आहेत.

Solar Pumps for Agriculture
Solar Pumps for Agriculture

सौरपंपाचे महत्त्वाचे भाग कोणते ?

  • सौर मीटर (डीसी किंवा बीएलडीसी किंवा एसी)
  • सूर्याची ऊर्जा साठविण्यासाठी उपयोगी पॅनल्स
  • सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा किंवा प्रचलित विजेचा वापर करून मोटारीला प्राप्त करून देण्यासाठी वापरला जाणारा कंट्रोलर (नियंत्रक)
  • सूर्य दिशेनुसार पॅनल हाताने किंवा मोटारीने फिरवायचे असल्यास लागणारा ट्रॅकर दक्षिण दिशेला निश्चित स्थानावर (फिक्स) राहू शकतो. हाताने सहज फिरविता येईल असाही ट्रॅकर असतो.
  • पॅनल 'फिक्स' ठेवण्यासाठी लागणारा ढाचा 
  • आवश्यक पाइप्स, केबल्स व सुटे भाग

सौरपंपाचे प्रकार किती?

अ) जमिनीवर स्थिरावणारे (सरफेस)

ब) पाणबुडी (सबमर्सिबल) - तरंगणाऱ्या ढाच्यावर विहिरीत टाकून पाण्याच्या पातळीनुसार खाली-वर होणाऱ्या स्टँडवर असलेले सरफेस किंवा सबमर्सिबल पंपही उपलब्ध आहेत.

शेतीमध्ये वापरल्या जाणारे सौर कृषि पंप:

  • किती एचपीपर्यंत यंत्रणा कार्यरत राहते ?

शेतीसाठी बहुतांश ०२ ते १० हॉर्सपॉवर क्षमतेपर्यंत (एचपी) पंप वापरले जातात. पन्नास एचपी क्षमतेचे पंपही उपलब्ध आहेत. हे पंप २० हजार ते १० लाख लिटर पाणी प्रतिदिन उपसू शकतात. दहा फुटांपासून ते एकहजार फुटांपर्यंत पाणी उपसण्याचे काम ते करतात. एकूण पाण्याची उपलब्धता, गरज व खोली (टोटल हेड) लक्षात घेऊन पंपाची निवड केली जाते.

  • सौरपंपाची निवड कशी करावी?

किती उंचीवर व दिवसभरात एकूण किती पाणी हवे आहे, हे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ठरवता येते.

  • सौरपंपासोबत ठिबक सिंचन वापरू शकतो का?

होय! ठिबकला लागणारे 'हेड' एकूण हेडच्या बेरजेत मात्र मिळवावे लागेल.

  • सौरपंप किती दाब क्षमतेपर्यंत पाणी देऊ शकतात?

एक हजार फुटापर्यंतही पाणी देऊ शकतात; परंतु एवढ्या खोलीतून मिळणारे पाणी अल्प प्रमाणात असते. जेवढी खोली जास्त तेवढे पाणी कमी.

  • दिवसभरात किती तास चालतो?

ऋतुमानाप्रमाणे कमीतकमी सहा व जास्तीतजास्त आठ तास कमी-अधिक प्रमाणात चालत राहतो. जास्तीचे पॅनेल लावल्यास तो लवकर सुरू होतो व संध्याकाळी उशिरा बंद होतो.

  • ठिबक सिंचनाचे वेळापत्रक सौरपंपाच्या कामगिरीप्रमाणे ठरविता येते का?

होय.

  • एसी व डीसी प्रकारात कोणती प्रणाली अधिक कायक्षम आहे?

नेहमीच्या एसी पंपापेक्षा डीसी पंप साधारणपणे ५० टक्क्यांपर्यंत अधिक कार्यक्षमतेनुसार पाणी उपसतो, असे अनुभवास आले आहे. सूर्याच्या दिशेप्रमाणे स्वयंचलित (auto tracking) यंत्रणा उभारली तर हे शक्य आहे.

  • देखभाल कशी ठेवावी?

लागणारे पॅनल्स स्वच्छ ठेवावेत. चोरी होऊ नये, यासाठी 'अँटी थेफ्ट' नटबोल्ट वापरणे आवश्यक असतात.

  • सौरपंपाची निवड कशी करावी?

पिकांना पाण्याची गरज व साधारणतः आठ तास चालविण्यासाठी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन निवड करावी.

  • सौरपंपाची अन्य वैशिष्ट्ये कोणती?

विजेसाठी लागणारे वहन व वितरण व डीपी आदींप्रमाणे प्रचंड जाळे उभारण्याची गरज नसते.

  • सौरपंपाचे प्रकार किती आहेत?

कृषिपंप हा विजेला व डिझेलला पर्याय व पर्यावरणाला अनुकूल म्हणून वापरला जातो. विहिरीतील किंवा बोअरचे पाणी काढण्यासाठी तो उपयुक्त असतो. ठिबक संच चालविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

सौर हातपंप - दिवसभरात कमी-जास्त खोलीप्रमाणे पाच ते १० हजार लिटर पाणी उपसून साठविता येते. किंवा नळाद्वारे हवे त्यावेळी वापरता येते. अल्पभूधारक शेतकरी याचा वापर करू शकतात.

सौर नॅनोपंप - घराच्या तळमजल्याच्या टाकीतून घराच्या वरच्या मजल्यांवरील टाक्यांमध्ये पाणी खेचून आणण्यासाठीही उपयोगी ठरतो. तीन ते चार हजार लिटर पाणी दिवसभरात चढविण्याची त्याची क्षमता आहे.

शेतकऱ्यांना सौर कृषि पंप उभारणीसाठी भारत सरकारच्या महाकृषि ऊर्जा अभियान - प्रधानमंत्री कुसुम (PM KUSUM)  महाराष्ट्र राज्य सरकारची मागेल त्याला सौर कृषि पंप योजने अंतर्गत शासकीय अनुदान देण्यात येते.

तर मित्रांनो तुम्हाला माझा "Solar Pumps for Agriculture" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

Post a Comment

0 Comments