Dangi cow information in Marathi डांगी या जातीच्या गोवंशाचे उगमस्थान उत्तर महाराष्ट्र येथे असून त्याची उपलब्धता नाशिक, ठाणे, नगर या जिल्ह्यांमध्ये आढळून येते.
Dangi cow information in Marathi |
नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील डांग जिल्ह्यातील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी मुख्यत्वेकरून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील शेती उंच व सखल भागात विभागलेली आहे.
डांगी गोवंश अतिशय काटक मानला जातो. तसेच विशिष्ट शरीररचना, अतिवृष्टीच्या भागात लग धरण्याची क्षमता आणि शेतीकामातील उपयुक्तता यामुळे शेतकरी डांगी बैलांचा वापर शेती कसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डांग नावाच्या पर्वतरांगांमध्ये या गोवंशाची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने या गोवंशास डांगी नाव पडले.
डांगी गोवंश कसा ओळखावा?
- महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील नाशिक, पालघर, ठाणे व अहमदनगर या जिल्ह्यांत डांगी गायीचे मूळस्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा, वसई, ठाणे जिल्ह्यातील शहापूर आदी तालुक्यांमध्ये डांगी गायींचे प्रमाण अधिक आहे.
- संपूर्ण पांढऱ्या रंगावर लहान आकाराचे काळे ठिपके, मस्तक रुंद व फुगीर, डोळे काळे व लहान, पाय काळे व जमिनीशी समांतर, नाकपुडी काळी, वशिंड आकर्षक, खूर काळे, कान गोल व पांढऱ्या रंगाचे व सड काळ्या रंगाचे, समान व लहान असतात. 'Dangi cow information in Marathi'
- कातडीखाली तेलाच्या ग्रंथी असल्यामुळे संततधार पावसातही अगदी सहजपणे डांगी जातीचे बैल काम करतात. पाय काटक व ताकदवान असल्याने डोंगरामाथ्यावर चरण्यासाठी जाणे तसेच भात लागवडीसाठी गाळ तयार करण्यासारखी कामे करणे शक्य होते.
- डांगी गोवंशाच्या कालवडी वयाच्या साधारणतः २० ते २४ व्या महिन्यात माजावर येतात. कळपाने राहणाऱ्या कालवडी याहीपेक्षा कमी वयात गाभण राहत असल्याची उदाहरणे आहेत.
- गायी दिवसाला साधारणतः तीन ते चार लीटर दूध देतात. दुधातील फॅटचे प्रमाण सामान्यतः ४.१ ते ४.४ इतके असते. उत्तम व्यवस्थापनात संगोपन करण्यात येणाऱ्या गायी चार ते पाच लीटरपर्यंत दूध देत असल्याची उदाहरणे आहेत.
डांगी जातीच्या उपजाती
डांगी जातीमध्ये रंगावरून काही उपजाती असल्याचे आढळून आले आहे.
- बहाळा : पांढऱ्या रंगावर जादा काळे व मोठे ठिपके
- मन्यारा : काळ्या रंगावर पांढरे ठिपके
- खैरा : पांढऱ्या रंगावर लाल ठिपके
- पारा : पांढऱ्या रंगावर लहान काळे ठिपके
- गवळा: काळ्या रंगावर लहान पांढरे ठिपके
- काळा : संपूर्ण काळा रंग Dangi cow information in Marathi
- मसूरी: पांढऱ्या रंगावर अगदी लहान काळे ठिपके
हे सर्व प्रकार जाती संदर्भाबाबत पशुपालकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आपापल्या आवडीनुसार व प्राप्त परिस्थितीत उपलब्ध वळूचा वापर केल्याने झालेले दिसून येते. यापैकी पशुपालकांना बहाळ्या रंगाच्या गायी बैलांना जादा मागणी असल्याचे दिसून येते. डांगी गोवंश आपल्या राज्यातील इतर देशी गोवंशाप्रमाणेच जागतिक तापमान वाढीत तग धरणारी आणि उच्च प्रतिकारक्षमता असणारा गोवंश आहे. तसेच यापासून मिळणारे दूध हे ए-२ प्रकारचे असल्याने प्रामाणिकपणे दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न झाल्यास नक्कीच पशुपालकांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
या पशुधनामध्ये असलेली वैशिष्ट्ये
- पावसामध्येही शेती कामासाठी उपयुक्त.
- पाय काटक व ताकदवान असल्यामुळे डोंगराळ भागात उपयुक्त.
- गाय प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देते.
- संपूर्ण पांढऱ्या रंगावर काळे लहानसर गोल ठिपके.
- रुंद मस्तक, शिंगे लहान व गोलाकार, डोळे काळे व पाणीदार, कान काळे व जमिनीला समांतर.
- वशिंड आकर्षक, कास गोलाकार पांढऱ्या रंगाची व चारही सड काळे.
- सलगपणे १८० ते २०० दिवस दूध देण्याची क्षमता.
- गोवंश अत्यंत काटक असून, सांसर्गिक रोगांना बळी पडण्याचे प्रमाणही कमी आहे.
0 Comments