डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना - Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच अनुसूचित जाती मध्ये येत असलेल्या नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. चला तर मग या योजनेविषयी जाणून घेऊया.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

अनुदान: 

या योजनेंतर्गत 
  • नवीन विहीर (रु.२.५० लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.५० हजार), 
  • इनवेल बोअरींग (रु.२० हजार), 'Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana'
  • पंप संच (रु.२० हजार), 
  • वीज जोडणी आकार (रु.१० हजार), 
  • शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.१ लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच- रु.५० हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.२५ हजार), 
  • पीव्हीसी पाईप (रु.३० हजार) परसबाग (रु.५००/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. 

सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

पात्रता: 
  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • जमिनीच्या ७/१२ व ८-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची जमिनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर याबाबीकरीताः
  • १) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • २) ७/१२ व ८-अ चा उतारा
  • ३) तहसीलवार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. १,५०,०००/- पर्यंत
  • ४) लाभार्थीच प्रतिज्ञापत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर
  • ५) अपंग असल्यास प्रमाणपत्र 
  • ६) तलाठी यांचेकडील दाखला सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • ७) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • ८) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • ९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • १०) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थीसह).
  • ११) ग्रामसभेचा ठराव. Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीताः
  • १) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • २) तहसीलदार याचेकडील मागील वर्षीचे बार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. १,५०,०००/- पर्यंत).
  • ३) जमीन धारणेचा अद्यावत ७/१२ दाखला व ८अ उतारा. ४) ग्रामसभेचा ठराव
  • ५) तलाठी यांचेकडील दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.२० ते ६ हेक्टर
  • मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतुःसीमा.
  • ६) लाभार्थीचे बंधपन्न (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर),
  • ७) कृषि अधिकारी (विघयो) याच क्षेत्रीय पहणी व शिफारसपत्र
  • ८) गट विकास अधिकारी याच शिफारसपत्र 
  • ९) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती / इनवेल बोअरींगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा काम सुरु होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
  • १०) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report
  • ११) अपंग असल्यास प्रमाणपत्र 

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीताः

  • १) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • २) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. १,५०,०००/- पर्यंत).
  • ३) जमीन धारणेचा अद्यावत ७/१२ दाखला व ८अ उतारा.
  • ४) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत)
  • ५) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
  • ६) शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमीपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • ७) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
  • ८) विद्युत कनेक्शन व विद्युत पपसंच नसलेबाबत हमीपत्र
  • ९) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
शेतकरी मित्रांनो आपण "Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana" या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.

येथे क्लिक करा: महाDBT Farmer

Post a Comment

0 Comments