पशुधनाची ओळख : माडग्याळ मेंढी - Madgyal Sheep Breed in Marathi

Madgyal Sheep Breed in Marathi महाराष्ट्रातील मेंढीपालन व्यवसायाचा विचार केला तर प्रामुख्याने हा व्यवसाय मांस उत्पादनासाठीच केला जातो. सध्या ज्या मेंढ्यांचा सांभाळ मेंढपाळ करत आहेत, त्या मेंढ्यांची उत्पादनक्षमता नगण्य आहे. शिवाय उत्पादनही कमी प्रतीचे आहे. त्यावर पर्याय म्हणून जलद वजनवाढ असलेल्या माडग्याळ मेंढीच्या जातीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Madgyal Sheep Breed in Marathi
Madgyal Sheep Breed in Marathi

पशुधनाची ओळख : माडग्याळ मेंढी

  • महाराष्ट्रात सध्या एक लाखाच्या आसपास कुटुंबांचा मेंढीपालनाचा व्यवसाय प्रामुख्याने पश्चिम व मध्य महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात केला जातो. त्यामुळे वर्षातील जवळजवळ सहा महिने चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळ व्यावसायिकांना भटकंती करावी लागते. राज्यात प्रामुख्याने कोल्हापुरी, लोणंद, माडग्याळ, सोलापुरी आणि संगमनेरी अशा उपजातींचा मेंढीपालनात समावेश होतो.
  • सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावचे सभोवताली सिद्धनाथ, कवठेमहंकाळ, रांजणी या भागात माडग्याळ मेंढ्या आढळून येतात. माडग्याळ या गावावरूनच या मेंढ्याना हे नाव प्राप्त झाले आहे. 
  • माडग्याळ हे जत तालुक्यातील गाव. या गावातील मेंढ्या अत्यंत हुशारीने फार पूर्वीपासून निवड पद्धतीने मांस उत्पादनासाठी विकसित करण्यात आल्या आहेत. आजही आप्पाची वाडी, घोलेश्वर, कोणीकोनूर, माडग्याळ, पंडोझरी, सनमडी, सोन्याळ या भागात शुद्ध जातीच्या माडग्याळ मेंढ्यांचे संगोपन केले जाते व मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जाते. 'Madgyal Sheep Breed in Marathi'
  • सन २०१२ च्या पशुगणनेनुसार सांगली जिल्ह्यातील एकूण माडग्याळ मेंढ्यांची संख्या १,५७,३९० आहे. 
  • माडग्याळ परिसरातील मुख्यत्वे धनगर आणि रामोशी समाज यांच्याकडे या मेंढ्या मोठ्या प्रमाणात आहेत.
  • अत्यंत छोटा कळप साधारणतः ३० ते ३५ मेंढ्याचा असतो, या मेंढ्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेता संबंधित मेंढपाळ या जातीचे संवर्धन अत्यंत काटेकोरपणे करीत आहेत. 
  • साधारणत ६ ते ९ महिन्याची कोकरे विक्रीसाठी तयार असतात. आटपाडी, माडग्याळ, जत, अशा नजीकच्या बाजारातून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. कर्नाटक, आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात पशुपालक या ठिकाणी खरेदीसाठी येतात.

माडग्याळ मेंढ्यांचे शारीरिक गुणधर्म

  • मेंढ्यांच्या शारीरिक गुणधर्माचा विचार केला तर त्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. 
  • नाक मात्र फुगीर असते. या नाकाला रोमन पद्धतीचा विशिष्ट बाक असतो. 
  • पाय लांब असतात. त्यामुळे काटकपणा दिसून येतो. 
  • डोके, चेहरा, पोट व पाय या भागावर लोकर आढळत नाही. 
  • तपकिरी रंगाचे शेपूट लहान, आखूड व पातळ असते. 
  • कान लांब, पानासारखे लोंबकळणारे असतात. 
  • खुरांचा रंगदेखील तपकिरी असतो. Madgyal Sheep Breed in Marathi
  • मेंढीमध्ये गोल कास व सड टोकदार असतात. 
  • ही जात अत्यंत काटक व अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरून राहणारी आहे. 
  • जलद वाढीबरोबरच वर्षातून एक वेत नियमित मिळते. 
  • जुळी कोकरे देण्याचे प्रमाण या जातीत जास्त आहे. 
  • १८ ते २४ महिन्यात कोकरू पहिल्यांदा विते.

माडग्याळ जातीची वैशिष्ट्ये

  • दख्खनी मेंढ्यापेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान, रंगाने पांढऱ्या व अंगावर तपकिरी चट्टे असणाऱ्या या मेंढ्याची शरीरवाढ चांगली असून बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करत आहेत. 
  • या मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन ३ ते ३.५ किलो असून तीन महिने वयाचे वेळचे वजन १८ ते २२ किलो व सहा महिने वयाचे वेळचे वजन २५ ते ३० किलो आहे. 
  • पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो एवढे आहे. तीन महिने वयापर्यंत या मेंढीचे वजन वाढीचा दर १७५ ते २४० ग्रॅम प्रति दिन एवढा आहे. या मेंढ्यांच्या अंगावर लोकर अत्यंत कमी असून त्यांची लोकर कातरणी फक्त एकदाच करतात.
  • जलदगतीने होणारी मेंढ्यांची वजनवाढ, त्यामुळेच या मेंढ्यांची आज बाजारात चढ्या दराने विक्री होते.

शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे या संस्थेमार्फत मेंढी विकासाबाबत विविध स्तरावर संशोधन करण्यात येत आहेत. 

माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाच्या प्रक्षेत्रावर केंद्र शासनाच्या मदतीने नामशेषप्रवण प्रजातीचे संवर्धन व विकास या कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून घेऊन रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली येथे हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याद्वारे निवडक सुधारीत मेंढे नर हे पशुपालकांना रास्तभावाने पुरविण्यात येणार आहेत. 

तर अशा या "Madgyal Sheep Breed in Marathi" माडग्याळ प्रजातीचे संवर्धन केल्यास महाराष्ट्राच्या मांस उत्पादनात निश्चितपणे वाढ होऊन ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होईल.

Post a Comment

0 Comments