Pandharpuri Buffalo Information in Marathi मित्रांनो, जगातील एकूण म्हशीच्या ५२ टक्के म्हशी भारतात आढळतात. भारतात म्हशीच्या एकूण १७ जाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील पंढरपुरी ही एक जातिवंत म्हैस म्हणून ओळखली जाते. सर्वाधिक दूध देणारया म्हशीही भारतातच आहेत, हे विशेष.
Pandharpuri Buffalo Information in Marathi |
पशुधनाची ओळख: पंढरपुरी म्हैस
- महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर, बेळगाव व निपाणी या परिसरात पंढरपुरी म्हशी आढळून येतात.
- फार पूर्वीपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि परिसरात संगोपन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या म्हशीस पंढरपुरी म्हैस म्हणून ओळखतात.
- या म्हशीला कर्नाटक मध्ये धारवाडी या नावाने ओळखतात. हिलाच विदर्भ मराठवाड्यात वऱ्हाडी, गावरानी म्हणतात.
- पंढरपुरी म्हैस आकाराने मध्यम व स्वभावाने शांत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध उत्पादन टिकवून ठेवण्याची क्षमता बाळगणारी ही जात आहे. पंढरपुरी म्हशी या काळ्या रंगाच्या तर, काही वेळा भुरकट रंगाच्याही आढळून येतात. शेपटीचा गोंडा मात्र पांढरा असतो. काही वेळा काळा पांढरा गोंडाही आढळून येतो. 'Pandharpuri Buffalo Information in Marathi'
- साधारणपणे पंढरपुरी म्हशींमध्ये वेतातील नियमितता हा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा व चांगला आढळून आला आहे. व्यायल्यानंतर अडीच ते तीन महिन्यात पुन्हा गाभण राहण्याचे प्रमाण या म्हशींमध्ये मोठे आहे.
- ३ ते ४ महिन्यांचा भाकड काळ, वेतातील नियमितता व दोन वेतातील कमी अंतर यामुळे पंढरपुरी म्हैस आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरते. पारड्यादेखील लवकर वयात येऊन गाभण राहतात व कमी वयात वेत होते. त्यामुळे संगोपन काळातील त्यांच्यावरील खर्च देखील कमी होतो.
- इतर जातीपेक्षा दुग्धोत्पादन कमी असले तरी गरीब शेतकऱ्यांना परवडणारी जात आहे. तसेच हवे तेव्हा पान्हा येत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये गवळी लोक रस्त्यावर पाहिजे तेव्हा ताजे दूध काढून देतात.
हे पण वाचा - पशुधनाची ओळख: नागपुरी व मराठवाडी म्हैस
पंढरपुरी म्हशींची वैशिष्ट्ये
- आकाराने मध्यम पण अतिशय काटक जात.
- लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोहचणारी लांब व पिळवटलेली तलवारीसारखी शिंगे.
- म्हशीचे वजन साधारण ४०० किलो व रेड्याचे वजन ५०० किलो असते.
- पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यात गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यात पहिल्यांदा वितात.
- मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ.
- पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य.
- एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध उत्पादन क्षमता.
- हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत.
पंढरपुरी म्हशींचे गुणधर्म
- पंढरपुरी म्हशीची शिंगे तलवारीच्या आकाराची बाक असलेली आणि खांद्यापर्यंत लांबसडक वाढलेली असतात. Pandharpuri Buffalo Information in Marathi
- जादा दूध देणाऱ्या म्हशीमध्ये छातीचा घेर हा कमरेच्या घेरापेक्षा कमी असतो.
- पाठीमागील चौकावरील हाडामध्ये साधारण २ ते २.५ फूट अंतर असेल तर ती म्हैस जास्त दूध देणारी असते. पंढरपुरी म्हशीचे डोके लांबोळे व निमुळते असून, नाकपुड्या मात्र उठावदार असतात.
- कास घोटीव असून, मांड्यांच्या आडाला लपलेली असते व पुढील भाग बेंबीच्या बाजूस लांबपर्यंत पसरलेला असतो. कासेचा आकार साधारणत उथळ घमेल्यासारखा आकार असतो. सड गोलाकार मुल्य असतात.
- दूध उत्पादन साधारण ६ ते ९ लिटर प्रतिदिन असते. एका वेताला सरासरी १५०२ लिटर दूध उत्पादन मिळते व त्यातील स्निग्धांश सरासरी ७ टक्के आढळून येतो. दूध उत्पादनातील सातत्य हा एक महत्त्वाचा गुणधर्म या जातीत आढळून येतो.
पंढरपुरी म्हशींची आढळ
- जातिवंत पंढरपुरी म्हशी या पंढरपूर व सोलापूर भागातील कार्तिकी वारीच्या बाजारात व मकर संक्रांतीला भरणारी श्री सिद्धेश्वर यात्रा, आठवडे बाजारात विकत मिळतात. तसेच सांगोला, कोल्हापूर व मिरज येथील बाजारातही या म्हशींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. तथापि, मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने या म्हशींच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
- पंढरपुरी म्हशीच्या पैदाशीसाठी गोठीत विर्याच्या मात्रा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर (०२३१-२६९३७१७) यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहमदनगर) अंतर्गत विभागीय कृषी संगोपन केंद्र व शेडा पार्क, कोल्हापूर येथे पंढरपुरी म्हशींवर संशोधन करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
- तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पशुधनविकास मंडळ, अकोला यांच्याद्वारे पंढरपूर, माढा, सांगोला व मंगळवेढा या ठिकाणच्या पंढरपुरी म्हैस संगोपन करणाऱ्या पशुपालकांसाठी वंशावळ निवडीतून उच्च आनुवांशिकतेच्या पंढरपुरी रेडे उत्पादन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
- या योजनेअंतर्गत घरपोच कृत्रिम रेतन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी उच्च प्रतीच्या वीर्यमात्रांचा वापर केला जातो, जेणेकरून जादा दूध उत्पादन देणाऱ्या पंढरपुरी म्हशींची पैदास होईल.
- पशुपालकांकडे असणाऱ्या जादा दूध देणाऱ्या पंढरपुरी म्हशींना बिल्ला मारून त्यांचे दूध उत्पादन नोंदी ठेवणाऱ्या पशुपालकांना रु. १०००/- प्रोत्साहनपर बक्षीसदेखील या योजनेअंतर्गत देण्यात येते.
- वंध्यत्व निवारण शिबिर, लसीकरण, गर्भतपासणी तसेच तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी व त्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. वेळोवेळी नर-मादी वासरांचे मेळावेदेखील आयोजित करून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यात येते.
शेतकरी मित्रांनो, "Pandharpuri Buffalo Information in Marathi" पंढरपुरी म्हशीसारख्या बहुगुणी म्हशींची जोपासना व संवर्धन ही काळाची गरज आहे.
0 Comments