Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi मित्रांनो, संपूर्ण जगात सर्वाधिक म्हशी असणारा देश भारत आहे. भारतात म्हशीच्या प्रमुख  जाती आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात नागपुरी आणि मराठवाडी ह्या जाती प्रामुख्याने आढळतात.

Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi
Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi

पशुधनाची ओळख: नागपुरी म्हैस

नागपुरी म्हैस:

  • नागपुरी म्हैस विदर्भातील वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळते.
  • नागपूर आणि विदर्भाच्या उष्ण वातावरणात जमवून घेणारी ही म्हशीची जात दूध उत्पादन आणि शेती कामासाठीदेखील उपयुक्त ठरली आहे. या जातीला बेरारी, गावराणी, वहाडी, आर्वी, गंगावरी या नावानेदेखील ओळखतात.
  • या म्हशींचा रंग काळा, काही वेळा डोक्यावर, पायावर व शेपटीवर पांढरा रंग आढळून येतो. शिंगे लांब, पसरट व मानेजवळून वरच्या दिशेस वळलेली असतात.
  • अत्यंत कमी खर्चात संगोपन करणे शक्य असते. सरसरी ४०० ते ५०० किलो वजनाच्या या म्हशी १०४० ते ११०० किलोपर्यंत प्रति वेत दूध उत्पादन देतात. एकंदर ७५० ते १५०० किलो या दरम्यान दूध उत्पादन देणाऱ्या म्हशी आढळून येतात. 'Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi'
  • या म्हशी मुख्यत्वे त्यांच्या फॅट टक्केवारीसाठी प्रसिद्ध आहेत. सरासरी ६.२५ टक्के फॅट मिळते. त्यामुळे त्यापासून चांगल्या प्रकारचा खवा व लोणी तयार होते. अत्यंत उष्ण तापमानास म्हणजे अगदी ४७ अंश सेल्सिअस तापमानाससुद्धा या म्हशी तग धरून राहतात.
  • नागपुरी म्हशींच्या संशोधनासाठी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय येथे प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सध्या पशुपैदास, प्रक्षेत्र तेलंगखडी येथे संगोपन व संवर्धन सुरू आहे.

Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi
Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi

पशुधनाची ओळख: मराठवाडी म्हैस

मराठवाडी म्हैस:

  • मराठवाडी म्हैस मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणारी जात आहे.
  • कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा भागात अत्यंत कमी खर्चात आणि निकृष्ट वैरणीच्या खाद्यावर जास्तीचे दूध देऊन संगोपन करण्यासाठी उत्तम जात समजली जाते.
  • वाळलेल्या ज्वारीचा कडबा खाऊन ४ ते ६ लिटरपर्यंत दूध उत्पादन या म्हशीपासून दररोज मिळते. मराठवाड्यातील दूध धंद्याचे अर्थचक्र या म्हशींच्या कमी भांडवली खर्चात अपेक्षित दूध उत्पादनामुळेच गतिमान होत आहे.
  • मराठवाडी म्हशींचा रंग पूर्ण काळा असून रुंद कपाळ व आखूड मान ही वैशिष्ट्ये आहेत. शिंगे गोल, आखूड व साधारण वळण घेऊन मानेच्या समांतर असतात.
  • शेपूट गुडघ्यापर्यंत व बांधा मध्यम असून, वजन ३२० ते ४०० किलोपर्यंत असते. काही म्हशींमध्ये माथ्यावर तसेच पायांवर पांढऱ्या रंगाचे मोठे ठिपके आढळतात. या म्हशीला मराठवाड्यात दूधनाथडी या नावानेही ओळखले जाते. Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi
  • या म्हशीच्या दुधात साधारणतः ८.८ टक्क्यांपर्यंत फॅट असते आणि प्रति वेत १२०० ते १८०० लिटर दूध उत्पादन मिळते. सरासरी १११८ लिटर दूध उत्पादन एका बेतात या म्हशींपासून मिळते.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत किफायतशीर अशी ही जात असून, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उदगीर येथील प्रक्षेत्रावर या जातीबाबत संशोधन करण्यात येते.

Buffalo information in Marathi

  • महाराष्ट्रात म्हशींच्या दुधाचे सर्वाधिक उत्पादन कोल्हापूर व मुंबई येथे होते.
  • म्हैस हा उष्ण कटिबंधात आढळणारा प्राणी असून तिच्या मासांत कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते.
  • निसर्गाच्या कलाने स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या दोन्ही प्रजाती काळाच्या ओघात तयार झाल्या व स्थानिक पशुपालकांनी त्याचे संगोपन व संवर्धन केले. कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयांना त्याबाबत संशोधन करून त्यासाठी मोलाची मदत केली आहे.

तर मित्रांनो तुम्हाला "Nagpuri and Marathwadi Buffalo information in Marathi" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर शेअर नक्की करा.