Sahiwal cow information in Marathi मित्रांनो, भारतातील 50 नोंदणीकृत देशी जातींच्या गाईंपैकी साहिवाल ही सर्वात जास्त दूध देणारी गाय आहे. याच प्रजाती बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Sahiwal cow information in Marathi |
ओळख पशुधनाची : साहिवाल
- साहिवाल ही भारतातील देशी जातीमधील जादा दूध देणारी एक प्रजाती आहे.
- पाकव्याप्त पंजाब प्रांतातील साहिवाल भागातील ही जात प्रामुख्याने भारतातील फिरोजपूर, अमृतसर या पंजाबमधील आणि गंगानगर या राजस्थानमधील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. 'Sahiwal cow information in Marathi'
- फिरोजपूर जिल्ह्यातील फजिलका आणि अलनोर भागात अत्यंत चांगल्या प्रकारच्या साहिवाल गायींचे कळप आणि गोठे आढळतात, लंबीबार, लोळा, मुलतानी आणि तेली या नावांनी देखील स्थानिक लोक या जातीला ओळखतात.
आणखी वाचा: पशुधनाची ओळख: गीर गाय
साहिवाल प्रजातीची वैशिष्ट्ये:
- साहिवाल गायीचा रंग तांबूस तपकिरी किंवा तांबूस करडा असतो. वळू आणि बैलामध्ये तो पायावर आणि तोंडावर थोड़ा ठळक आढळतो. काही ठिकाणी पांढरे ठिपके आढळतात.
- कास मोठी व शिंगे आखूड असतात. साधारणपणे बाहेरच्या बाजूला वळून वरती जातात व परत आत वळलेली असतात. वशिंडाचा आकार बन्यापैकी असतो.
- विशेषतः वळू आणि बेलामध्ये मोठ्या आकाराचे वशिंड आढळते. पोटाचा आकार मध्यम असतो. शेपूट लहान व पातळ असते. Sahiwal cow information in Marathi
- सरासरी २३२५ किलो दूध उत्पादन प्रती देत मिळते. साधारणपणे १६०० ते २७५० किलोच्या दरम्यान दूध उत्पादन असते. म्हणजे प्रतिदिन १६ ते १८ किलो दूध उत्पादन मिळते, दुधातील फॅटचे प्रमाणही अधिक असते.
साहिवाल प्रजातीची व्याप्ती:
- साहिवाल गायीच्या दूध उत्पादनाचा विचार करूनच ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी या गायीचा वापर करून आपल्या देशात संकरिकरणासाठी वापर करण्यास सुरुवात केली आहे.
- भारत सरकारनेदेखील राष्ट्रीयगोकूळ मिशन अंतर्गत साहिवाल जातीच्या संवर्धनासाठी विशेष तरतूद करून त्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले आहेत.
- संकरित गायीच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी असल्यामुळे जादा पशुपालक साहिवाल गायीच्या पालनातून दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत.
- जादा उन्हात तग धरणे व गरीब स्वभावामुळे आणि चांगल्या दूध उत्पादनामुळे महाराष्ट्रातदेखील युवा पशुपालक साहिवाल जातीच्या संवर्धनातून आपल्या दुग्धव्यवसायात नफा कमवू लागला आहे.
तर मित्रांनो तुम्हाला "Sahiwal cow information in Marathi" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका!
0 Comments