Modified Biogas Plant नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE), भारत सरकार ने 2 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय जैव ऊर्जा कार्यक्रम अधिसूचित केला आहे. MNRE ने आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी राष्ट्रीय जैव ऊर्जा कार्यक्रम सुरू ठेवण्याची अधिसूचना जरी केली आहे.
या कार्यक्रमांतर्गत जैववायूच्या (Biogas) विविध प्रकारच्या मॉडेल्सचा प्रचार केलेला आहे. सर्वसाधारणपणे या मॉडेल्सचे वर्गीकरण दोन प्रकारात करता येईल.
- तरंगते वायुपात्र असलेले सामान्यतः याला केव्हीआयसी (KVIC), गणेश, प्रगती, फेरो सिमेंट या नावाने ओळखतात.
- स्थिर घुमट असलेले याला जनता किंवा दीनबंधु नावाने ओळखतात.
![]() |
| Modified Biogas Plant |
सुधारित बायोगॅस संयंत्र
- नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयव्दारा देशात उभारलेल्या कौटुंबिक पध्दतीच्या जैववायू संयंत्रामध्ये गाई, बैल, म्हैस, शेळी इत्यादींच्या शेणाचा वापर करतात, त्यामध्ये जनावरांचे शेणाएवढेच पाणी टाकून व एकजीव मिश्रण करून संयंत्रात टाकतात.
- पाचन झालेले शेण संयंत्रामधून मळी म्हणून पाण्याइतक्या पातळ रूपात बाहेर येते. ही मळी 45 दिवस मोकळया खड्ड्यात सुकविली जाते व त्यानंतर खत म्हणून शेतात वाहून नेता येते.
- उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे बरेचसे संयंत्र दरवर्षी अकार्यक्षम राहतात. त्यामुळे जैववायू तंत्रज्ञान देशातील, पाणी टंचाईग्रस्त भागात पाण्याच्या कमतरतेमुळे स्वीकारले नाही. त्यामुळे त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या जनावरांच्या ओल्या शेणाच्या गोवऱ्या तयार करून इंधन म्हणून जाळतात. किंवा कम्पोस्ट करुन जैविक खत म्हणून वापरल्या जातात. 'Modified Biogas Plant'
- त्याच बाबींचा विचार करून स्थिर घुमट असलेले जनता आणि दीनबंधु प्रकारच्या कौटुंबिक आकाराच्या बॉयोगॅस (जैववायू) संयंत्राच्या डिझाईनमध्ये जनावराचे ताजे ओले शेण पाचन करण्याबाबतचे संशोधन, डिझाईनचे मूल्यांकन, कार्यकुशलता इत्यादीचे परिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांतर्गत यशस्वीरित्या करण्यात आले.
- सुधारित जैववायू यंयंत्र स्थिर घुमट असलेले जनता तसेच दीनबंधु संयंत्राच्या सध्याच्या रचनेत प्रवेश मार्ग आणि निकासमार्ग हे जनावरांचे ताजे ओले शेण (टोटल सॉलीड्स 16 ते 18 टवके भरण्यास योग्य व्हावे व पाचीत मळी 184डायजेस्टेड स्लरी182 बाहेर येण्यासाठी संशोधन केल्या गेले. यासाठी पाचक यंखच्या रचनेत तसेच निर्माण साहित्य बांधकाम पध्दतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या सुधारित संयंत्राची विशेषता अधी आहे.
- स्थिर घुमट असलेले जनता तसेच दीनबंधु या संयंत्राच्या सध्याच्या रचनेत प्रवेश मार्ग आणि निकासमार्ग हे जनावरांचे ताजे ओले शेण (टोटल सॉलीड्स 16 ते 18 टक्के) भरण्यास योग्य व्हावे व पाचीत मळी (डायजेस्टेड स्लरी) सहजतेने बाहेर येण्यासाठी संशोधन केल्या गेले. यासाठी पाचक यंत्राची रचना, निर्माण साहित्य, तसेच बांधकाम पध्दतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
अधिक वाचा - अशी घ्या बायोगॅस संयंत्राची काळजी व देखभाल
सुधारित बायोगॅस संयंत्राची वैशिष्ट्ये
- सामान्य डिझाईन संयंत्राच्या तुलनेत ताज्या ओल्या शेणापासून स्थिर घुमटाच्या संयंत्रातून 30 टवके पेक्षा जास्त जैववायू उत्पन्न होतो. सुधरित यंयंत्राचा धारणकाळ सामान्य संयंत्राचा धारणाकाळ सामान्य संयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू निर्मितीत वाढ झाली. Modified Biogas Plant
- शेणासोबत मिश्रणासाठी पाण्याची गरज नाही. किंबहुना कमीत कमी पाणी लागते. त्यामुळे ताजे ओले घनरूप शेण सहजतेने भरता येते.
- सुधारित संयंत्रातून निघणारी मळी (स्लरी) ही एक आठवडयात वाळते. त्यामुळे शेतात वाहुन नेण्यासाठी फार जागा व कष्ट लागतात.
- बांधकामाचा खर्च हा सामान्य डिझाईन इतकाच आहे.
महत्वाचे: सुधारित संयंत्राच्या प्रवेश पाईपाचा कोन ठरवून दिलेल्या (75 अंश) मापापेक्षा कमी नसावा. कोन कमी झाल्यास जनावरांच्या शेणचा, प्रवेश मार्गातील प्रवाह हळू होईल. सुधारित संयंत्राच्या निर्मितीसाठी अनुभवी आणि कुशल कारागिराची निवड करावी.
सयंत्राची घ्यावयाची काळजी
- ओले घनरूप शेण संयंत्राच्या क्षमतेनुसार दररोज टाकावे.
- शेण ओले असणे आवश्यक आहे.
- मळी दररोज बाहेर काढावी.
तर मित्रांनो तुम्हाला माझा "Modified Biogas Plant" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

No comments:
Post a Comment