Biodiesel Production From Non Edible Oil मित्रांनो, दिवसेंदिवस प्रत्येकाला वाढत्या प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर पारंपरिक ऊर्जेचे स्रोत देखील संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर ही काळाची गरज आहे. पेट्रोल, डिझेल ऐवजी बायोडिझेल हे पर्यावरणपूरक इंधन उत्तम पर्याय आहे. चला तर मग याविषयी अधिक जाणून घेऊया.
बायोडिझेल म्हणजेच जैविक इंधन हे वनस्पतीजन्य तेलापासून तयार केले जाते. त्यासाठी खाद्य आणि अखाद्य तेलाच्या वनस्पतींचा वापर होऊ शकतो.
आपल्या भारतासारख्या विकसनशील देशात खाद्य तेलाची टंचाई असतांना त्याचा वापर आपण जैविक इंधन निर्मितीसाठी करू शकत नाही.
यास्तव अखाद्य तेलबिया वृक्षांचा जैविक इंधन निर्मितीसाठीचा पर्याय आपणापुढे आहे. आपल्याकडील वातावरणाचा विचार केला तर जट्रोफा (वन एरंड), करंज, कडूनिंब, सिमारुबा (लाक्ष्मितरू) आणि जोजोबा इत्यादि. वृक्षांची जैविक इंधन म्हणजेच बायोडिझेलसाठी लागवड योग्य ठरू शकते.
![]() |
| Biodiesel Production From Non Edible Oil |
अखाद्य तेलापासून बायोडिझेल निर्मिती:
- शेतकरी स्वतः बायोडिझेलची निर्मिती करून साठा करून ठेऊ शकतो. घरगुती उत्पादीत बायोडिझेलचा उपयोग डिझेलवर चालणारे यंत्र तसेच शेतात सिंचनाकरता वापरण्यात येणारे डिझेल पंप, थ्रेशर, ट्रॅक्टर, ट्रक इ. करीता करू शकतो.
- ऊर्जानिर्मितीत कोणावरही विसंबून न राहता स्वयंपूर्ण होणे शक्य आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की, दहा ते वीस टक्के जैविक इंधन पेट्रोल, डिझेलमध्ये मिसळले तर ते पूर्णतः सुरक्षित आहे. 'Biodiesel Production From Non Edible Oil'
- बायोडिझेल आणि पेट्रोल डिझेलची तुलना केली तर बायोडिझेलमुळे होणारे वातावरणातील प्रदूषण अगदी नगण्य आहे.
- जैविक इंधनाची सध्याची गरज व होणारा पुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यासाठी आपणास बायोडिझेल आयात करण्यावरच भर द्यावा लागतो.
- आपण सर्वसाधारणपणे ७०% खनिज इंधन आयात करातो. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वनस्पतीजन्य जैविक इंधन निर्मिती करणे होय. जैविक इंधन आपण पुन्हा पुन्हा तयार करू शकतो म्हणून बायोडिझेल हा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे.
तेलबिया वृक्षांपासून बायोडिझेल निर्मिती:
- बायोडिझेल निर्मितीमुळे आपण इंधनाच्या खर्चात बचत करू शकतो तसेच पडीक जमिनीवर अखाद्य तेल निर्मिती करणाऱ्या तेलबिया वृक्षांची लागवड करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यायाने कृषी अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते. Biodiesel Production From Non Edible Oil
- बायोडिझेल कोणत्याही वनस्पतीजन्य तेलापासून ट्रान्सइस्टरीफिकेशन पद्धतीने तयार करता येते. आपल्या देशात खाद्य तेलाचा तुटवडा असल्यामुळे अखाद्य तेलबिया वृक्षाची पडीक जमिनीत लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या तेलापासून बायोडिझेल उत्पादनास खूप मोठा वाव आहे.
- महाराष्ट्रामधील बराचसा भाग हा कोरडवाहू तसेच पडीक जमिनीचा आहे, त्यामध्ये वनएरंड व करंज यांसारख्या कमी पाण्यावर जगणाऱ्या झाडांची शात्रीय पद्धतीने लागवड केल्यास भविष्यात बायोडिझेल निर्मितीला चालना मिळून सध्याच्या इंधन टंचाईवर मात करता येऊ शकेल.
बायोडिझेल तयार करण्याची पद्धत
बायोडिझेलचे फायदे:
- शहरी तसेच ग्रामीण भागासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोत
- कोणत्याही तेलापासून बनवता येते
- तयार करण्याची व हाताळण्याची अत्यंत साधी सोपी कमी खर्चाची व घरगुती पद्धत
- बायोडिझेलमध्ये १० ते ११ टक्के प्राणवायू असतो त्यामुळे ते १०० टक्के ज्वलनशील असते.
- बायोडिझेलचा सीटेन नंबर ५१ – ६२ च्या वर असल्याने त्वरीत व जास्त दिवस साठवून ठेवतो येते
- दुर्गंध विरहीत असते
- बायोडिझेल जाळल्यानंतर अत्यंत कमी व पांढरा धूर निघतो. या धुरात कार्बनडायऑक्साईड व गंधकाचे प्रमाण नगण्य असते पर्यायाने कमी प्रदूषण होते
- पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन
- ग्रामीण भागात स्वयंरोजगारासाठी संधी
- पडीक जमिनीचा वापर
- प्रदूषणास आळा बसतो
- पर्यावरणपूरक इंधन
तर मित्रांनो तुम्हाला माझा "Biodiesel Production From Non Edible Oil" हा लेख कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद!

No comments:
Post a Comment